सारा अली खानचं वय वर्षे 28.. अन् इतके अफेअर्स, जाणून व्हाल हैराण

| Updated on: May 10, 2024 | 3:45 PM

Sara Ali Khan | अनिल कपूर यांचा मुलगा ते माजी मुख्यमंत्र्यांचा नातू... 28 वर्षीय सारा अली खान हिचे इतके अफेअर्स जाणून व्हाल थक्क..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान हिच्या खासगी आयुष्याची चर्चा... आता कोणाला करतेय डेट?

सारा अली खानचं वय वर्षे 28.. अन् इतके अफेअर्स, जाणून व्हाल हैराण
Follow us on

अभिनेत्री सैफ अली खान हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम करत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘केदारनाथ’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सारा हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. सारा आजच्या घडीला बॉलिवूडच्या सर्वत प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. चाहत्यांमध्ये सारा हिच्या प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा तर रंगलेल्या असतात, पण खासगी आयुष्यामुळे देखील सारा कायम चर्चेत असते. आजपर्यंत अनेक सेलिब्रिटींसोबत सारा हिच्या नावाची चर्चा रंगली.

मीडिया रिपोर्टनुसार, सारा अली खान हिने अभिनेते अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर याला देखील डेट केलं आहे. पण अभिनेत्रीची आई अमृता सिंग यांना सारा आणि हर्षवर्धन यांचं नातं मान्य नव्हतं… ज्यामुळे सारा हिने ब्रेकअपचा निर्णय घेतला. हर्षवर्धन याच्यानंतर सारा हिने नाव अभिनेता ईशान खट्टर याच्यासोबत जोडलं जाऊ लागलं.

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये बॉलिवूडच्या दोन भावांपैकी एकाला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. तेव्हा ईशान खट्टर याचं नाव समोर आलं. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही.

हे सुद्धा वाचा

सारा हिच्या नावाची चर्चा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहाडिया याच्यासोबत देखील जोडण्यात आलं होत. अभिनेत्रीने वीर याच्यासोबत असलेल्या नात्याला मंजूरी देखील दिली होती. रिपोर्टनुसार, सारा अली खान आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या नात्याची देखील चर्चा रंगली होती.

अनेकांसोबत सारा हिच्या नावाची चर्चा रंगली, पण अभिनेता कार्तिक आर्यन याच्यासोबत सारा हिचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेकदा कार्तिक याच्यासोबत असलेल्या नात्यावर अभिनेत्रीने खुलासा देखील केला. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

सारा अली खान हिचं नाव अभिनेता विजय देवरकोंडा आणि क्रिकेटर शुबमन गिल यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण चर्चा रंगल्यानतर रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली आहे.

सांगायचं झालं तर, सारा हिने नाव अनेकांसोबत जोडण्यात आलं, पण आपल्या मुलीने कोणाच्या प्रेमात पडू नये… असं अमृता सिंह हिला वाटतं. कारण अमृता हिने करियरच्या शिखरावर असताना सैफ अली खान याच्यासोबत लग्न केलं आणि संपूर्ण वेळ कुटुंबाला दिला.

सध्या सारा कोणाला डेट करत नसल्याची माहिती देखील समोर येत आहे. सध्या अभिनेत्री फक्त तिच्या करियरवर लक्ष केंद्रित करत आहे. सोशल मीडियावर देखील सारा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर साराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.