सारा अली खानच्या आयुष्यातील खास पुरुष, त्याच्या निधनानंतर अभिनेत्री म्हणते…

| Updated on: Jun 22, 2024 | 3:33 PM

Sara Ali Khan | 'या' पुरुषाला कधीच विसरू शकत नाही सारा आली खान, त्याच्यामुळे अभिनेत्रीच्या आयुष्यातील अनेक गोष्टी झाल्या सहज सोप्या... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान हिने व्यक्त केलेल्या भावनांची चर्चा.... तुम्हीही व्हाल भावूक...

सारा अली खानच्या आयुष्यातील खास पुरुष, त्याच्या निधनानंतर अभिनेत्री म्हणते...
Follow us on

अभिनेत्री सारा अली खान हिने ‘केदारनाथ’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज सोनाक्षी हिला कोणत्या ओळखीची गरज नाही. सांगायचं झालं तर, सारा कायम तिच्या आयुष्यातील चांगल्या – वाईट घटना चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता देखील अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीबद्दल सांगितलं आहे. साराच्या आयुष्यातील ही खास व्यक्त दुसरी तिसरी कोणी नाही तर, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आहे. ‘केदारनाथ’ सिनेमात सुशांत आणि सारा यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती.

पहिल्याच सिनेमातून सारा यशाच्या शिखरावर पोहोचली. सारा – सुशांत यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सारा हिने सुशांत सोबत असलेल्या आठवणी ताज्या केल्या. यावेळी अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी देखील आलं.

सारा म्हणाली, ‘शुटिंग दरम्यानचा एक किस्सा आहे. जेव्हा गट्टू सर (दिग्दर्शक अभिषेक कपूर) मला काही सांगून निघून गेले. त्यांनी काय सांगितलं मला काहीही कळलं नाही. त्यामुळे मी सुशांतकडे गेली त्याने मला उत्तम रित्या सर्वकाही समजावून सांगितलं. सिनेमात तेव्हा मी पूर्णपणे सुशांतची कॉपी केली.’

‘मला सुरुवातील चांगली हिंदी देखील बोलता येत नव्हती. पण आज अनेक चाहते माझ्यावर प्रेम करत आहेत. चाहते माझं कौतुक करत असतात. याचं कारण फक्त आणि फक्त सुशांत आहे. ‘केदारनाथ’ सिनेमानंतर मला जे प्रेम मिळालं ते प्रेम फक्त सुशांतमुळे आहे. त्याच्यासोबत अनेक आठवणी आहेत…’

सांगायचं झालं तर, सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान या दोघांनी केदारनाथ सिनेमात अप्रतिम काम केलं आहे. दोघांची केमिस्ट्रीही लोकांना आवडली. पण 2020 मध्ये सुशांत सिंग राजपूतने जगाचा कायमचा निरोप घेतला. आजही त्याच्यासोबत काम केलेले कलाकार आणि चाहते अभिनेत्याला विसरू शकलेले नाहीत.

14 जून 2020 मध्ये सुशांत याने स्वतःला संपवले.  अभिनेत्याच्या निधनाला चार वर्ष झाली आहेत. 4 वर्षांनंतर देखील सुशांत याला कोणी विसरु शकलेलं नाही. पण अभिनेत्याचं निधन का झालं याबद्दल काहीही कळू शकलेलं नाही. सोशल मीडियावर सुशांत याचे अनेक जुने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.