Sara Ali Khan Love Life: अभिनेत्री सारा अली खान हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. बॉलिवूडमध्ये काम करत असताना सारा खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली. सारा हिच्या नावाची चर्चा अनेक सेलिब्रिटींसोबत रंगली. आता देखील साराचं नाव सुपरमॉडल प्रताप बाजवा याच्यासोबत जोडलं जातं आहे. शिवाय सारा आणि प्रताप यांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो समोर आल्यामुळे सारा आणि अर्जुन यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
सोशल मीडियावर आता व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये सारा आणि अर्जुन एकमेकां सोबत दिसत आहेत. फोटोंमध्ये अर्जुन आणि सारा देवपूजा करताना दिसत आहेत. दोघांच्या फोटोंवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अर्जुन आणि सारा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
फोटो पाहून एक नेटकरी म्हणाला, ‘अर्जुन एका पंजाबी राजनेत्याचा मुलगा आहे. अर्जुन चांगला मुलगा आहे. मुंबईमध्ये तो एक मॉडेल आहे. शिवाय अर्जुन गडगंज श्रीमंत आहे.’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘फोटो पाहिल्यानंतर चांगलं वाटतं आहे.’ सध्या सर्वत्र फक्त सारा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
अर्जुन प्रताप बाजवा एक सुपरमॉडेल आणि अभिनेता आहे. अर्जुन याने रोहित आणि वरुण बलसारख्या डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केला आहे. अर्जुन ऑस्कर नामांकित दिग्दर्शक गिरीश मलिक यांच्या ‘बँड ऑफ महाराजाज’मध्येही दिसला होता. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या स्लिंग सिनेमासाठी त्याने प्रभू देवाला मदत केली होती.
अर्जुन यांने 2022 पर्यंत पंजाबच्या जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाचा सर्वात तरुण प्रतिनिधी म्हणून काम पाहिलं . रिपोर्ट्सनुसार, अर्जुनने लॉरेन्स स्कूल, सनावरमधून राजकारण आणि कृषी विषयात पदवी घेतली आहे. शिवाय अर्जुन जिम्नॅस्ट आणि MMA फायटर देखील आहे.