मुंबई : अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल लवकरच ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाच्या माध्यमातून सारा आणि विकी पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. सध्या सारा अली खान आणि विकी कौशल आगामी सिनेमा ‘जरा हटके जरा बचके’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. विकी आणि सारा स्टारर सिनेमा 2 जून 2023 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान सिनेमाची चर्चा तुफान रंगलेली असताना, सारा आणि विकी आयपीएल 2023 चा अंतिम सामनासाठी अहमदाबादला पोहोचले. पण साराने आयपीएलचा अंतिम सामना पाहणं क्रिकेटर शुभमन गिल याच्या चाहत्यांना आवडलेलं नाही.
आयपीएलच्या अंतिम सामन्यात शुभमन गिल याचा पराभव झाल्यामुळे क्रिकेटरचे चाहते संताप व्यक्त करत आहेत. सारा स्टेडियममध्ये फक्त शुभमनची फलंदाजी पाहण्यासाठी गेली होती आणि शुभमन फक्त 39 धावा करून बाद झाला… असं शुभमनच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. सारा स्टेडियममध्ये आल्यामुळे शुभमन पराभूत झाला असं अनेकांचं मत आहे.
लाइव्ह क्रिकेट पाहण्यासाठी साराचे स्टेडियमवर पोहोचणे आणि शुभमन गिल लवकर बाद झाल्यामुळे लोक अभिनेत्रीला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. एक युजर कमेंट करत म्हणाला ‘ज्याप्रकारे सारा आनंदी दिसत आहे… दोघांचं ब्रेकअप झालं असं वाटत आहे..’ तर अन्य एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘गिलने सारा का सारा मूड खराब केला.. #SaraAliKhan त्याच्यासाठी पनवती आहे…’
What an incredible stumping by Dhoni! #CSKvsGT pic.twitter.com/VQsP2dSnUC
— DealzTrendz (@dealztrendz) May 29, 2023
दरम्यान सध्या सर्वत्र सारा अली खान आणि शुभमन गिल यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. सारा अली खान आणि शुभमन गिल यांचं ब्रेकअप झाल्याचं सांगण्यात येत आहे.. ही गोष्ट समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.. गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान आणि शुभमन गिल यांच्या अफेअरच्या चर्चा तुफान रंगल्या हेत्या. आता दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावरून अनफॉलो केलं आहे..
सारा खान आणि शुभमन गिल यांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघांना एकत्र फिरताना स्पॉट करण्यात आलं. शिवाय दिल्ली येथील एका हॉटेलच्या बाहेर पडताना दोघांना एकत्र कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं. त्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं. पण आता सारा आणि शुभमन गिल यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगत आहेत.