मुंबई : सारा अली खान ही कायमच चर्चेत असते. सारा अली खान हिचा काही दिवसांपूर्वीच जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे हा चित्रपट धमाका करताना दिसला. नुकताच सारा अली खान ही करण जोहर याच्या कॉफी विथ करण 8 मध्ये पोहचली. यावेळी काही मोठे खुलासा करताना सैफ अली खान याची लेक दिसली. कॉफी विथ करण 8 मध्ये थेट आपल्या रिलेशनशिपवरही सारा अली खान हिला खुलासा केलाय. यामुळेच सध्या सारा अली खान ही चर्चेत आहे.
सारा अली खान हिला करण जोहर याने शोमध्ये थेट क्रिकेटर शुभमन गिल आणि तिच्या नात्याबद्दल विचारले. कारण गेल्या काही दिवसांपासून सतत सारा अली खान आणि शुभमन गिल यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. शुभमन गिल याला सारा अली खान ही डेट करत असल्याचे सांगितले जातंय. मात्र, यावर आता जरा स्पष्टच बोलताना सारा अली खान ही दिसली आहे.
सारा अली खान म्हणाली की, मला सर्वजण दुसरी सारा समजत आहेत. मित्रांनो तुम्ही साराला चुकीचे समजले आहे. दुनिया चुकीच्या साराच्या मागे पडली आहे, प्लीज…आता साराने हे स्पष्ट केले आहे की, ती शुभमन गिल याला डेट करत नाहीये. पुढे सारा अली खान म्हणाली की, शुभमन गिल याच्यासोबत काही खास मैत्री देखील तिची नाहीये.
इतके नाही तर यावेळी सारा अली खान हिने तिच्या रिलेशनवर देखील भाष्य केले आहे. सारा अली खान हिने स्पष्ट केले की, ती सिंगलच आहे. सारा अली खान म्हणाली की, मी खूप जास्त सिंपल लोकांपैकी एक आहे. परंतू मी माझ्या आयुष्यात सिंगल आहे. काही गोष्टींमधून ती बाहेर पडल्याचे सांगताना देखील सारा अली खान ही दिसली.
सारा अली खान ही कार्तिक आर्यन याला डेट करत असल्याची चर्चा होती. इतकेच नाही तर सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. मात्र, काही दिवसांपूर्वीच यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले केले. लोकांना कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांची जोडी प्रचंड आवडत देखील असे. मात्र, शेवटी त्यांचे ब्रेकअप झाले.