मुंबई: अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन ही जोडी ब्रेकअपनंतरही सतत चर्चेत आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सारा लंडनला फिरायला गेली. त्याचवेळी कार्तिकनेही लंडनमधील व्हेकेशनचे फोटो पोस्ट केल्याने हे दोघं एकत्र आहेत की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला. मात्र साराच्या नवीन फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोमध्ये ती एका मिस्ट्री मॅनसोबत पहायला मिळतेय.
या फोटोमध्ये सारा आणि त्या मिस्ट्री मॅनने स्वॅगमध्ये पोझ दिला आहे. साराच्या पुढे उभ्या असलेल्या या व्यक्तीने काळ्या हुडीने आपला चेहरा झाकला आहे. या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतोय.
हा कार्तिक आर्यनसारखा दिसतोय, असं काहींनी म्हटलंय. तर कार्तिक दुसऱ्या मुलीला डेट करतोय. तर सारासोबत ही व्यक्ती कोण, असा प्रश्न दुसऱ्या युजरने विचारला आहे. काहींनी तो साराचा भाऊ इब्राहिम खान असल्याचंही म्हटलंय.
‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटात एकत्र काम करताना सारा आणि कार्तिक एकमेकांच्या प्रेमात पडले. काही महिने दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर काही कारणास्तव त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर कार्तिकचं नाव हृतिक रोशनची बहीण पश्मिना रोशनशी जोडलं गेलं. मात्र त्याने या चर्चा फेटाळल्या होत्या. आता तो गायक प्रतीक कुहडची एक्स गर्लफ्रेंड निहारिका ठाकूरसोबत लंडनमध्ये दिसला.
मध्यंतरीच्या काळात साराचे फोटो क्रिकेटर शुभमन गिलसोबतही व्हायरल झाले होते. एका मुलाखतीत शुभमनला याविषयी प्रश्नसुद्धा विचारण्यात आला होता. तुझ्या मते बॉलिवूडमधील सर्वांत फिट अभिनेत्री कोणती, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शुभमनने लगेच साराचं नाव घेतलं.
साराचं नाव घेतल्यानंतर त्याला डेटिंगविषयी पुढचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “कदाचित”. ‘सारा का सारा सच बोलो’, असं सूत्रसंचालकाने बोलल्यावर शुभमनच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. “सारा दा सारा सच बोल दिया.. कदाचित हो, कदाचित नाही”, असं त्याने पुढे सांगितलं होतं.