मुंबई | 19 मार्च 2024 : अभिनेत्री सारा अली खान हिने फार कमी वयात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. ‘केदारनाथ’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या सारा अली खान हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. सारा हिचे काही सिनेमे सुपर फ्लॉप झाले तरी देखील साराने अपयश स्वीकारून पुढे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. आज बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींच्या यादीत साराचं नाव देखील सामिल आहे. सारा फक्त तिच्या सिनेमांमुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील सारा कायम चर्चेत असते. एका मुलाखतीत खुद्द साराने वडिलांच्या दुसऱ्या पत्नीबद्दल सांगितलं आहे.
एका मुलाखतीत सारा म्हणाली होती, ‘इतके वर्ष झाले आहेत माझे वडील आणि करीनाचं लग्न झालं आहे. मी करीनाला पर्सनली ओळखते याचं मला आश्चर्य वाटतं. माझ्या कॉलेजच्या मित्रांना मी वडिलांच्या घरी घेऊन गेली होती. जेव्हा मी करीनाची ओळख माझ्या वडिलांची पत्नी अशी करून देत होती तेव्हा मी स्वतः हैराण होती. आज देखील माझी अशीच अवस्था असते. ‘
‘अनेक जण कायम मस्करीत म्हणतात की, करीना तुझी नातेवाईक असावी अशी तुझीच इच्छा होती. कारण पहिल्यापासून मी करीनाची फार मोठी चाहती आहे. करीना आणि माझ्यात मैत्रीचं नातं आहे. ती कधी माझी आई होण्याचा प्रयत्न करत नाही आणि मी कधी दुसऱ्या आईच्या शोधात नव्हती. एवढंच नाहीतर, माझे वडील देखील याबद्दल आमच्यावर दबाव टाकत नाहीत…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान आणि करीना कपूर खान यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
सैफ अली खान याचं पहिलं कुटुंब म्हणजे अभिनेत्री अमृता राव… सैफ याने कमी वयात अमृता हिच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सैफ – अमृता यांना एक मुलगी म्हणजे सारा आणि एक मुलगा इब्राहिम अली खान आहे.
अमृता हिच्यासोबत घटस्फोट झाल्याच्या अनेक वर्षांनंतर सैफने अभिनेत्री करीना हिच्यासोबत लग्न केलं. खास पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. सैफ आणि करीना यांना दोन मुलं आहे. तैमूर अली खान आणि जेह अली खान अशी दोघांच्या मुलांची नावे आहेत.