मंदिरात जात असल्यामुळे सारा अली खान ट्रोल; म्हणाली, ‘चार लोकं माझ्याबद्दल काय बोलतील…’

| Updated on: Apr 02, 2023 | 11:02 AM

केदारनाथ तर कधी महाकाल... मंदिरात जाण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सारा अली खान हिचं रोखठोक उत्तर.. ट्रोल करणाऱ्या काय म्हणाली सारा? जाणून घ्या...

मंदिरात जात असल्यामुळे सारा अली खान ट्रोल; म्हणाली, चार लोकं माझ्याबद्दल काय बोलतील...
Follow us on

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान (sara ali khan) हिने ‘केदारनाथ’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली, त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. एवढंच नाही तर, साराचा स्वभाव देखील चाहत्यांना प्रचंड आवडतो. कारण सारा ज्या अंदाजात चाहत्यांसोबत गप्पा मारते, चिमुकल्या चाहत्यांसोबत फोटो काढते… इत्यादी गोष्टींमुळे सारा चाहत्यांमध्ये चर्चेत असते. सारावर प्रेम करणाऱ्यांची संख्या जेवढी अधिक आहे, तेवढीच मोठी संख्या अभिनेत्राचा विरोध करणाऱ्यांची देखील आहे. आपण साराला अनेकदा देवदर्शनाला गेलेलं पाहिलं असेल. कधी केदारनाथ तर कधी महाकाल… मंदिरात देव दर्शनासाठी गेल्यामुळे देखील अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

सारा ज्याठिकाणी फिरायला जाते, तेथील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच सारा हिमाचल याठिकाणी बिजली महादेव या मंदिरात पोहोचली होती. तेव्हा अभिनेत्रीला अनेकांनी ट्रोल केलं. शिवाय अनेकांनी तिच्या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट करत संताप व्यक्त केला. पण मंदिरात जाण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना साराने रोखठोक उत्तर दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

सारा म्हणाली, ‘जर माझ्या कामामुळे प्रेक्षकांना काही अडचण असेल तर, ती माझी मोठी समस्या आहे. कारण मी माझ्या चाहत्यांसाठी अभिनय करते. पण जर कोणाला माझ्या खासगी आयुष्यामुळे त्रास होत असले तर, चार लोकं माझ्याबद्दल काय विचार करतात याचा मला फरक पडत नाही….’ असं सारा म्हणाली.

 

 

साराच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, मोठ्या पड्यावर आपली ओळख निर्माण केल्यानंतर साराने आपला मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मच्या दिशेने वळवला आहे. सारा लवकरच ‘गॅसलाइट’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र साराच्या आगामी सिनेमाची चर्चा आहे.

सिनेमात सारासोबत अभिनेता विक्रांत मैसी आणि अभिनेत्री चित्रांगदा सिंग मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहें. सिनेमा ३१ मार्च रोजी Disney+ Hotstar प्रदर्शित होणार आहे. साराने सिनेमाबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील माहिती दिली आहे. (sara ali khan life)

सारा आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सारा फक्त तिच्या सौंदर्यामुळेच नाही तर, तिच्या स्वभावामुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असते. शिवाय सारा तिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असते.