Sara Ali Khan | आई अमृता आणि भाऊ इब्राहिम थेट ‘या’ कारणामुळे लागले रडायला, सारा अली खान हिने

| Updated on: Jun 05, 2023 | 6:03 PM

सारा अली खान हिचा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. सारा अली खान या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली होती. सारा अली खान ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते.

Sara Ali Khan | आई अमृता आणि भाऊ इब्राहिम थेट या कारणामुळे लागले रडायला, सारा अली खान हिने
Follow us on

मुंबई : सारा अली खान हिचा जरा बचके जरा हटके हा चित्रपट (Movie) नुकताच रिलीज झालाय. विशेष म्हणजे इतर बाॅलिवूड चित्रपटांच्या तुलनेत या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद हा मिळताना दिसत आहे. जरा हटके जरा बचके चित्रपटासाठी सारा अली खान (Sara Ali Khan) हिचे काैतुक केले जात आहे. या चित्रपटात सारा अली खान हिने जबरदस्त असा अभिनय केल्याची चर्चा आहे. सारा अली खान आणि विकी काैशल यांची जोडी प्रेक्षकांना जबरदस्त आवडलीये. विशेष म्हणजे सारा अली खान आणि विकी काैशल (Vicky Kaishal) यांच्या चित्रपटाने तीन दिवसांमध्ये 22 कोटींची कमाई केल्याचे सांगितले जात आहे.

सारा अली खान आणि विकी काैशल हे चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले होते. सारा अली खान ही नुकताच थिएटरमध्ये आई अमृता आणि भाऊ इब्राहिम अली खान यांच्यासोबत तिचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट पाहण्यास गेली होती. विशेष म्हणजे सर्वसामान्य लोकांसोबत तिने चित्रपट बघण्याचा आनंद घेतला.

सारा अली खान म्हणाली की, चित्रपट बघताना माझे आई आणि भाऊ कधी हॅप्पी, इमोशनल तर कधी थेट रडताना दिसले. सारा अली खान हिने चित्रपट बघतानाचा त्यांचा अनुभव सांगितला. जरा हटके जरा बचके चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून सारा अली खान ही आनंदी झाली आहे. या चित्रपट हिट ठरताना दिसत आहे.

जरा हटके जरा बचके हा चित्रपट बघायला आल्याबद्दल सारा अली खान हिने आई आणि भावाचे आभार देखील मानले आहेत. सारा म्हणाली की, माझा हा चित्रपट पाहून त्यांना माझा अभिमान वाटला आहे. सारा अली खान आणि विकी काैशल हे दोघे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

कतरिना कैफ ही देखील पतीच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली होती. कतरिना कैफ हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना जरा हटके जरा बचके चित्रपट बघण्यास जाण्याची विनंती ही केली. हा चित्रपट खूप जास्त प्रेमाने तयार करण्यात आल्याचे देखील कतरिना कैफ हिने म्हटले होते. कतरिना कैफ हिची ही पोस्ट तूफान व्हायरल देखील झाली होती.