मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) याची लेक सारा अली खान हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. सारा अली खान ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना सारा दिसते. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान हिचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे सारा अली खान हिच्या या चित्रपटाने मोठा धमाका हा केलाय. सारा अली खान हिच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळली.
जरा हटके जरा बचके या चित्रपटामध्ये सारा अली खान हिच्यासोबत विकी काैशल हा मुख्य भूमिकेत दिसला. विशेष म्हणजे चाहत्यांना सारा अली खान आणि विकी काैशल यांची जोडी प्रचंड आवडली. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सारा अली खान आणि विकी काैशल दिसले. या चित्रपटाने नक्कीच तूफान अशी कामगिरी ही केलीये.
सध्या सोशल मीडियावर सारा अली खान हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सारा अली खान ही आपल्या भावांसोबत रक्षाबंधन साजरी करण्यासाठी करीना कपूर आणि सैफ अली खान याच्या घरी पोहचलीये. सारा अली खान हिचे तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान हे सावत्र भाऊ आहेत. यांनाच राखी बांधण्यासाठी सारा पोहचलीये.
यावेळी सारा अली खान ही ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे. सारा अली खान हिचा हा लूक चाहत्यांना जबरदस्त आवडलाय. पापाराझी यांना पाहून फोटोसाठी पोझ देताना देखील सारा अली खान दिसलीये. आपल्या लहान भावांसाठी खूप सारे गिफ्ट घेऊन सारा अली खान पोहचल्याचे दिसत आहे. आता सारा अली खान हिचा हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी सैफ अली खान याचा वाढदिवस झाला. या वाढदिवसासाठी खास सारा अली खान ही पोहचली होती. यावेळी सारा अली खान हिच्या हातामध्ये केक आणि काही फुगे देखील दिसत होते. करीना कपूर आणि सैफ अली खान याच्या घरी आयोजित केलेल्या प्रत्येक पार्टीमध्ये सारा अली खान ही उपस्थित असते.
सारा अली खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सारा अली खान ही काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये रिक्षाने फिरताना दिसली. याचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. चक्क लग्झरी गाड्या सोडून सारा अली खान रिक्षाने फिरताना दिसल्याने चाहत्यांनी देखील तिचे काैतुक केले होते.