मुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही मित्र असतात, जे कायम चांगल्या – वाईट परिस्थितित आपल्यासाठी आणि कुटुंबासाठी भक्कमपणे उभे राहतात. अभिनेते अनुपम खेर, सतीश कौशिक आणि गीतकार जावेद अख्तर यांची मैत्री देखील प्रचंड खास होती. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अनुपम खेर आणि जावेद अख्तर यांना मोठा धक्का बसला आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर दोघांनी कौशिक कुटुंबाची साथ सोडली नाही. आजही सतीश कौशिक यांच्या कुटुंबासाठी जावेद अख्तर आणि अनुपम खेर कायम मदतीसाठी पुढे असतात. एवढंच नाही तर, सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अनुपम खेर कायम त्यांची ११ वर्षांची मुलगी वंशिका कौशिक हिच्यासोबत अनेक ठिकाणी उपस्थित राहतात.
दरम्यान, १३ एप्रिल रोजी दिवंगत अभिनेते सतीश कौशक यांचा वाढदिवस होता. अशात अनुपम खेर यांनी मित्राच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात अनेकांनी सतीश कौशिक यांच्यासोबत असलेल्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या शेवटी सतीश कौशिक यांची मुलगी वंशिका हिने वडिलांसाठी लिहिलेली चिट्ठी वाचली.
वंशिकाने वडिलांसाठी लिहिलेली चिट्ठी वाचून कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. वंशिकाचा व्हिडीओ अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र वंशिकाने वडिलांसाठी लिहिलेल्या चिट्ठीची चर्चा सुरु आहे. अमुपम खेर यांच्या पोस्टवर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
Last evening was exceptional. All of us were laughing non stop with tears in our eyes. @Javedakhtarjadu said something wonderful “अगर मेरा कोई दोस्त वादा करे की वो भी अनुपम की तरह मेरी भी ज़िंदगी celebrate करेगा तो मैं आज मरने के लिये तैयार हूँ”। It’s very rare to find amazing… https://t.co/kWmyMWd0dp
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) April 14, 2023
वंशिकाचा व्हिडीओ पोस्ट करत अनुपम खेर यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेते म्हणाले, ‘माझे मित्र सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांच्या ११ वर्षीय मुलीने एका बंद लिफाफ्यात एक चिट्ठी माझ्याकडे दिली आणि म्हणाली, ही चिट्ठी माझ्या वडिलांच्या चितेवर ठेवा. मी तिने सांगितलं तसं केलं. पण मी तिला चिट्ठीचा फोटो काढण्यासाठी सांगितला. जेव्हा वंशिकाने वडिलांसाठी लिहिलेली चिट्ठी वाचली, तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं…’
अनुपम खेर यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील भावना व्यक्त केल्या आहेत. विवेक अग्निहोत्री म्हणाले, ‘जावेद अख्तर काय म्हणाले आहेत, जर माझा कोणी मित्र अनुमप खेर यांच्या प्रमाणे माझ्यासाठी काम करणार असले तर, मी आजही मरणासाठी तयार आहे.. सतीश कौशिक यांच्या सारखा मित्र असणं फार भाग्याची गोष्ट आहे…’ सध्या सर्वत्र सतीश यांच्या मुलीने लिहिलेल्या चिट्ठीची चर्चा होत आहे.