मुंबई : दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (satish kaushik) यांचं हृदय विकाराच्या झटक्यामुळे निधन झालं. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण निधनानंतर देखील त्यांच्या अनेक आठवणी चाहत्यांसोबत आणि सेलिब्रिटींसोबत आहेत. सतीश कौशिक यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात रंगमंच कलाकार म्हणून केली. त्यानंतर सतीश कौशिक यांनी त्यांचा मोर्चा सिनेमांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक या दिशेने वळवला. गेल्या वर्षी अभिनेता आमिर खान याने एका मुलाखतीत सतीश कौशिक यांच्याबद्दल मोठी गोष्ट सांगितली. ती गोष्ट आज आमिर खान याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुफान चर्चेत आली आहे.
एका मुलाखतीत आमिर खान म्हणाला, आमिर याला बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करायचं होतं. आमिरला दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यासोबत काम करायचं होतं. तेव्हा शेखर कपूर ‘मिस्टर इंडिया’ सिनेमाच्या कामात व्यस्त होते. सिनेमात सतीश कौशिक यांच्याकडे कॅलेंडर या भूमिकेशिवाय सिनेमाच्या सहाय्यक दिग्दर्शकाची देखील जबाबदारी होती.
आमिर म्हणाला, ‘मी शेखर कपूर यांना भेटण्यासाठी गेलो होतो. कारण दिग्दर्शक शेखर कपूर माझ्या आवडीच्या दिग्दर्शकांपैकी एक होते. त्यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची माझी इच्छा होती. तेव्हा सतीश कौशिक सिनेमात मुख्य सहाय्यक दिग्दर्शक होते. मी त्यांच्यासोबत बैठक केली आणि माझं पेपरवर्क दाखवलं.’
‘माझं काम पाहिल्यानंतर शेखर कपूर खूश झाले. तेव्हा इंडस्ट्रीमध्ये कोणी पेपरवर्क करत नव्हतं, सतीश कौशिक देखील नाही.’ पण तरी देखील ‘मिस्टर इंडिया’ सिनेमासाठी आमिर खानची निवड झाली नाही. यावर आमिर म्हणाला, ‘अखेर सतीश यांनी मला सांगितलं, तू मला भेटायला आला तेव्हा गाडी घेवून आला. तर मला वाटलं अशा ज्यूनियरची का निवड करू ज्याच्याकडे गाडी आहे…’
पुढे आमिर म्हणाला, ‘मी सतीश यांना सांगितलं ती माझी गाडी नव्हती. मी कोणाचं तरी काम करत होतो म्हणून मला ती गाडी मिळाली होती. मी फिल्मी कुटुंबातील असलो तरी सरकारी वाहतुकीने प्रवास करतो.. असं देखील मी सतीश कौशिक यांना सांगितलं.’
तेव्हा आमिर खान याच्याबद्दल सतीश कौशिक यांना गैरसमज झाला. नाही तर आज ‘मिस्टर इंडिया’ सिनेमात बॉलिवूडच्या परफेक्शनिस्टची देखील महत्त्वाची भूमिका असती.
सतीश कौशिक यांनी 1993 मध्ये रूप की रानी चोरों का राजा’ या सिनेमातून दिग्दर्शनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘बधाई हो बधाई’ यांसारख्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं. शिवाय कंगना रनौत हिच्या ‘इमरजेन्सी’ सिनेमाचं दिग्दर्शन देखील कौशिक यांनी केलं आहे. सिनेमा कौशिक यांच्या निधनानंतर प्रदर्शित होणार आहे. शिवाय ‘गन्स एन्ड गुलाब’ सतीश कौशिक यांचा शेवटचा वेब शो ठरणार आहे.