मुंबई : लॉकडाऊनमध्ये लोक ओटीटी प्लॅटफॉर्मकडे करमणुकीचे साधन म्हणून वळले. मात्र, त्याची सवयच लोकांना लागली आहे. अनलॉकमध्ये आता थिएटर सुरू झाले आहेत. तरीही लोक थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. असे असताना देखील या आठवड्यात राहुल रॉयचा सयोनी चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.(Sayoni will be screened in cinemas)
या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीनकुमार गुप्ता यांनी केले आहे. या चित्रपटात राहुल रॉयसोबत तन्मय सिंह, मुस्कान सेठी आणि योगराज सिंह महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील. ब्रेन स्ट्रोक आला तेव्हा राहुल रॉय नितीनकुमार गुप्तासमवेत एलएसीचे शूटिंग करत होते.
ब्लैक विडोज
मोना सिंग, शमिता शेट्टी आणि स्वस्तिका मुखर्जी यांची वेब सीरिज ब्लैक विडोज आज जी 5 वर रिलीज होत आहे. ही तीन महिलांची कहाणी आहे. ज्यामध्ये पतींच्या छळाला कंटाळून पतीचा बळी त्या घेतात. आणि नंतर त्यांच्या निघून जाण्याचा शोक व्यक्त करतात. पण खरे ट्विस्ट तेंव्हा येते ज्यावेळी त्यापैकी एकजण परत येतो. या मालिकेत मोनासिंग, शमिता शेट्टी आणि स्वस्तिका मुखर्जी रायमा सेमन, शरद केळकर आणि आमिर अली हे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
अनपॉज्ड
अनपॉज्ड आज अमेजॉन प्राइम रिलीज होणार आहे. अनपॉज्डमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की यात पाच कथा असतील ज्या पाच वेगवेगळ्या लोकांनी दिग्दर्शित केल्या आहेत. राज निदिमोरू आणि कृष्णा डीके, नित्या मेहरा, तनिष्ठा चटर्जी, निखिल आडवाणी आणि अविनाश अरूण यांनी दिग्दर्शित केले आहे. अनपॉज्डमध्ये सैयामी खेर, रत्ना पाठक शाह, अभिषेक बनर्जी, लिलेट दुबे आणि गुलशन देवैया यांनी महत्वाची भूमिका केली आहे.
स्वीट होम
कोरियन सीरीज स्वीट होम आज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सीरीजचे 10 भाग आहेत. ही कथा त्या काळाची आहे. जेव्हा मनुष्य वहशी दरिंदे होते. दरम्यान, एक मुलगा आपल्या शेजार्यांसह या वहशी दरिंदे लोकांमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो.
संबंधित बातम्या :
Neha Kakkar : महिन्याभरापुर्वी शुभमंगल, नेहा कक्करला आताच डोहाळे ? बघा फोटोचं वास्तव
पखवाज वादक पंडित रविशंकर उपाध्यायला अटक, विद्यार्थिनीने केला छेडछाडीचा आरोप!
(Sayoni will be screened in cinemas)