‘लोकशाहीच्या आईचा खरा…’ दिग्दर्शक हंसल मेहतांनी अब्दुल्ला यांना असं सुनावलं की, आता ते बोलण्याआधी…

| Updated on: Jan 13, 2024 | 11:56 AM

Maharani | दिग्दर्शक हंसल मेहता यांनी असं सुनावलं की, उमर अब्दुल्ला आता बोलण्याआधी हजारवेळा नक्कीच विचार करतील. अभिनेत्री हुमा कुरैशीची वेब सीरीज ‘महारानी’ चर्चेत आहे. टि्वट जिव्हारी लागल्यानंतर हंसल मेहता यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. नेमका वाद काय झाला?

लोकशाहीच्या आईचा खरा... दिग्दर्शक हंसल मेहतांनी अब्दुल्ला यांना असं सुनावलं की, आता ते बोलण्याआधी...
Maharani Web Series
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशीची वेब सीरीज ‘महारानी’ चर्चेचा विषय बनली आहे. हुमाच्या या सीरीजवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय. हुमा कुरैशीची ‘महारानी’ ही वेब सीरीज जम्मू-काश्मीर विधानसभेच्या परिसरात शूट करण्यात आली आहे. आता याच मुद्यावरुन ‘महारानी’ वेब सीरीजवर टीका सुरु झाली आहे. ‘महारानी’ शूटिंगवरुन नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुलल्ला यांनी निशाणा साधताना ही लज्जास्पद बाब असल्याच म्हटलं आहे. हुमा कुरैशीची ही वेब सीरीज चारा घोटाळ्याशी संबंधित आहे. लालू यादव यांनी तेव्हा पत्नी राबडी देवीला मुख्यमंत्री पदावर बसवलं होतं. हा मुद्दा या सीरीजच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडण्यात आलाय. पण उमर अब्दुल्ला यांनी महारानीच्या शूटिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. त्यांनी X वर फोटो पोस्ट केलेत.

“लोकशाहीच्या आईचा खरा चेहरा. जिथे एकवेळ वेगवेगळ्या धर्माचे लोक आणि जम्मू-काश्मीरमधून निवडलेले लोक एखाद्या विषयावर कायदा बनवायचे. त्याच विधानसभेत आता अभिनेते आणि अभिनेत्री ड्रामा करत आहेत. किती शरमेची बाब आहे की, भाजपाने लोकशाही किती वाईट स्थितीत आणून ठेवलीय. इतकच नाही, त्या लोकांकडे नकली मुख्यमंत्री आहे, जो त्या कार्यालयातून बाहेर पडतो. 6 वर्ष मला तिथे खास अधिकार मिळाले होते. किती लाजेची बाब आहे!!!!” असं उमर अब्दुल्ला यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटलय.


नॅशनल कॉन्फ्रेंसचे उमर अब्दुल्ला यांचं हे वक्तव्य दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या प्रचंड जिव्हारी लागलं. त्यांनी अब्दुल्ला यांच्या टि्वटला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. हंसल मेहता यांनी उमर अब्दुल्ला यांच्या टि्विटला रिट्वीट केलं.


तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाकडून त्यांना….

“यात लाज वाटण्यासारख काय आहे?. ड्रामाच्या शूटिंगमुळे लोकशाही किंवा लोकशाहीच्या आईचा अपमान कसा होता? चित्रपटाच्या सेटवरील अभिनेते आणि बॅकग्राऊंड अभिनेत्यांना तुम्ही एक्स्ट्रा म्हणता, ते सर्व या देशाचे नागरिक आहेत, त्यांना प्रतिष्ठेने काम करण्याचा पूर्ण अधिकार आहे. खासकरुन तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाकडून त्यांना सन्मान मिळाला पाहिजे. जगातील अनेक देशात आम्हाला शूटिंगसाठी पब्लिक प्लेस, सरकारी इमारती, काऊन्सिल हॉल सारख्या जागांचा वापर करण्याची परवानगी दिली जाते. अशा प्रकारच्या वर्तनामुळे भारताला अनफ्रेंडली शूटिंग लोकेशन मानल जातं. म्हणून आम्ही परदेशात शूटिंग करण्याला प्राधान्य देतो” असं हंसल मेहता यांनी म्हटलय.