मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात एक नवीन खुलासा झाला आहे. सुशांतचे माजी सहाय्यक दिग्दर्शक हृषिकेश पवार फरार झाल्याची बातमी आहे. एनसीबी हृषिकेश पवारचा शोध घेत आहे. हृषिकेशवर आरोप आहे की तो सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज पुरवत होता. यापूर्वी हृषिकेश पवारच्या वतीने मुंबई कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. (Search for Hrishikesh Pawar in Sushant Singh Rajput case continues)
परंतु हायकोर्टाने पुन्हा सत्र न्यायालयात जाण्यास सांगितले. आणि गुरुवारी हृषिकेश पवारची याचिका फेटाळून लावली आहे. जेव्हा एनसीबीची टीम हृषिकेश पवारच्या चेंबूरच्या घरी गेली होती तेव्हा तो घरी नव्हता आणि त्यानंतर त्याला फरार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती देताना सांगितले की, ते हृषिकेशचा शोध घेत आहेत.
हृषिकेश पवारने काही काही काळ सुशांत सिंगसोबत काम केले. पण गेल्या वर्षी त्याला काढून टाकण्यात आले होते. गेल्या वर्षी बॉलिवूड ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीदरम्यान हृषिकेश पवारचे नाव समोर आले होते. सुशांतचे कर्मचारी दिपेश सावंतने सांगितले होते की, हृषिकेश पवार हा सुशांतला ड्रग्ज पुरवत होता.
स्टार प्लसवर ‘किस देश मे है मेरा दिल’ मालिकेतून 2008 मध्ये टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर झी टीव्हीवर ‘पवित्र रिश्ता’ मालिका प्रचंड गाजली होती.
पवित्र रिश्ता मालिकेतील सहअभिनेत्री अंकिता लोखंडे सोबत सुशांतची जोडी अत्यंत लोकप्रिय ठरली होती. सुशांत आणि अंकिता काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र दोन वर्षांपूर्वी दोघं विभक्त झाले होते.
2013 मध्ये ‘काय पो छे’ चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी, पीके असे सिनेमे गाजले.
एम एस धोनी चित्रपटात त्याने धोनीची भूमिका केली होती. या भूमिकेने तो यशोशिखरावर पोहोचला. नुकतेच त्याचे केदारनाथ, छिछोरे हे चित्रपट लोकप्रिय ठरले.
संबंधित बातम्या :
माझ्यावर अन्याय होतोय म्हणत कंगनाचा ‘नारीजापाढा’, म्हणते, ‘देशहिताची गोष्ट बोलले की माझ्यावर टीका’
(Search for Hrishikesh Pawar in Sushant Singh Rajput case continues)