टीव्ही अभिनेत्री निया शर्मा अशा लोकांपैकी एक आहे जी स्पष्टपणे बोलते. निया सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती तिच्या ट्रोलर्सला योग्य प्रत्युत्तरही देताना दिसते.
जबरदस्त फॅन फॉलोईंगमुळे निया शर्मानं प्रत्येक घरात स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली आहे.
निया अनेकदा इन्स्टाग्रामवर आपले फोटो, व्हिडीओ शेअर करते आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना अपडेट देते. तरुणांमध्ये निया शर्माचं एक वेगळं क्रेझ आहे. पॉप कल्चरपासून ते पारंपारिक पोशाखांपर्यंत, निया प्रत्येक लूकला उत्तम कॅरी करते.
निया शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गुरुवारी तिनं स्वत:चा एक व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये तिनं प्रथम मेकअपसोबत आणि नंतर मेकअपशिवाय स्वत:ला दाखवलं.
निया शर्मानं केलेल्या फोटोशूटसाठी तिने जांभळ्या रंगाचा सॅटिन नाईट सूट परिधान केला. फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत नियानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘Selling lies like…’.