बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या लग्नाच्या बातमीमुळे चांगलीच चर्चेत आहे. 23 जून रोजी सोनाक्षी सिन्हा विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात. इंडस्ट्रीत अनेकदा दोघांना एकत्र पाहिलं गेलं आहे. दोघांना लग्नासाठी आधीच सर्वजण शुभेच्छा देत आहेत. या दरम्यान सोनाक्षी सिन्हाचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, मी सध्या दिल्लीत आहे. मला मुलीची तिच्या लग्नाबाबत काय योजना आहे याबाबत फारशी माहिती नाही. ती लग्न करणार आहे का? असा तुमचा प्रश्न आहे. पण आत्तापर्यंत मला तरी याबद्दल सांगण्यात आलेले नाही. मला देखील माध्यमांतून कळतेय की ती लग्न करणार आहे. सांगेल जेव्हा सांगेल तेव्हा आमचे आशीर्वाद तिच्या पाठीशी असतील. जगातील सर्व सुख त्यांना मिळावे अशी माझी इच्छा आहे.
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, माझा माझ्या मुलीवर विश्वास आहे. ती कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाही. ती प्रौढ आहे आणि स्वतःचे निर्णय घेऊ शकते. जेव्हा माझ्या मुलीचे लग्न होईल तेव्हा मी तिच्या लग्नाच्या वरातीत नाचणार आहे.
शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणतात की, मला अनेकांनी विचारले आहे की, तुम्हाला याबद्दल माहिती नाही आणि मीडियाला सर्व काही माहित आहे. यावर मी एवढेच सांगू शकतो. आजकालची मुलं पालकांना कुठे विचारतात? फक्त येऊन सांगतात. मी फक्त सांगण्याची वाट पाहत आहे.
झहीर इक्बाल हा व्यवसायाने अभिनेता आहे. झहीरचा जन्म 10 डिसेंबर 1988 रोजी झाला. मुंबई स्कॉटिश स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचे वडील इक्बाल रतनसी हे एक ज्वेलर्स चालवतात आणि व्यापारी आहेत. एवढेच नाही तर तो सलमान खानचा मित्र आहे. तर झहीरची आई गृहिणी आहे. जहीरची बहीण सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे आणि त्याचा लहान भाऊ कम्प्युटर इंजिनिअर आहे.