Marathi News Entertainment Seven years old kabir khandare dedication towards acting walked bare foot in 42 degree temperature
7 वर्षांच्या कबीरची अभिनयासाठी जिद्द; 42 डिग्री तापमानात अनवाणी केलं शूटिंग
"शूटिंगदरम्यान सोलापूरच्या जवळजवळ 42 डिग्री तापमानामध्ये आम्ही शूट करत होतो आणि त्याच्या कॅरेक्टरनुसार सुरुवातीच्या काही सीन्समध्ये त्याच्या पायामध्ये चप्पल नाहीत. जवळपास सलग बारा दिवस तो अनवाणी पायाने जंगल, माळरान, डांबरी रोड, गावभर चेहऱ्यावरती किंचितही वेदना न दाखवता फिरत होता," असंही त्यांनी सांगितलं.
1 / 5
नुकतंच पार पडलेल्या 'पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल'मध्ये 'जिप्सी' हा चित्रपट दाखविण्यात आला होता. या चित्रपटातील 'जोत्या' नावाच्या एका डोंबाऱ्याच्या लहान मुलाची भूमिका अतिशय चोखपणे पार पाडणाऱ्या अवघ्या 7 वर्षाच्या कबीर खंदारे या बालकलाकराला 'स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर' या सन्मानाने गौरविण्यात आलं.
2 / 5
प्रेक्षकांबरोबरच अनेक समीक्षक, पत्रकार आणि मान्यवरांनी कबीरचं खूप कौतुक केलं. कबीरच्या अभिनयाची खरी सुरुवात तर तो त्याच्या आईच्या पोटात अवघ्या सहा महिन्यांचा असतानाच झाली होती. पुण्यातील एका दिग्दर्शकाला एक गर्भवती स्त्रीच्या भूमिकेसाठी एका कलाकाराची गरज होती. त्यावेळी कबीरच्या आईने तो रोल केला होता.
3 / 5
त्याच्यानंतर अगदीच काही महिन्यांचा असताना महेश खंदारे दिग्दर्शित 'मारेकरी' या शॉर्ट फिल्ममध्ये त्याने लहान बाळाचं काम केलं. त्यानंतर दिग्दर्शक शशि चंद्रकांत खंदारे यांच्या 'द लास्ट पफ' नावाच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये साधारणतः एक वर्षाचा असताना त्याने काम केलं होतं.
4 / 5
त्याने आतापर्यंत अनेक नामांकित दिग्दर्शकांसोबत लघुपट, जाहिराती, माहितीपट तसंच नुकत्याच एका हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केली आहे. दिग्दर्शक शशि चंद्रकांत खंदारे दिग्दर्शित 'सुरमा' या लघुपटामध्ये त्याने एक महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. त्या भूमिकेसाठी कबीरला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांमध्ये चार वेळा 'बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट' म्हणून गौरविण्यात आलं आहे.
5 / 5
'जिप्सी'चे दिग्दर्शक शशि चंद्रकांत खंदारे यांना कबीरच्या इतक्या निरागस अभिनयामागचं रहस्य काय आहे, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "मुळातच कबीर हा अतिशय उत्तम अभिनेता आहे आणि त्याला अभिनयाची खूप आवड आहे. त्याला एखादी गोष्ट कशी करायची हे करून दाखवलं की त्याच्यापेक्षा अतिशय उत्तम पद्धतीने तो साकारतो. त्याचबरोबर अभिनयासाठी असणारी सोशिकता, सहनशक्ती त्याच्याकडे खूप आहे."