Shafaq Naaz Bold Bikini Photos: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री शफक नाझ कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. शफक हिने अनेक मालिका आणि सीरिजमध्ये भूमिका बजावली. पण ‘महाभारत’ मालिकेतून अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत अधिक वाढ झाली. शफक हिने ‘महाभारत’ मालिकेत माता कुंती यांची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीने साकारलेल्या भूमिकेला चाहत्यांना डोक्यावर घेतलं. पण आता शफक हिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
शफक नाझ हिने सोशल मीडियावर बिकिनीमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीला बिकिनीमध्ये पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. रविवारी शफक हिने इन्स्टाग्रामवर स्वतःचे बिकिनीतील फोटो पोस्ट केले आहे. फोटोमधील शफक हिचा हॉट अंदाज काही चाहत्यांना आवडला आहे तर, अनेकांनी अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे.
शफक हिने निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. मोकळे केस सोडून अभिनेत्री स्विमिंगपूलमध्ये फोटोशूट केलं आहे. फोटो पोस्ट अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये काही इमोजी पोस्ट केल्या आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. अभिनेत्री बिकिनीतील तीन फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. सोशल मीडियावर शफक हिचे बिकिनीतील फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
अभिनेत्रीच्या फोटोंवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तुला असे फोटो पोस्ट करणं योग्य नाही… तू माता कुंती यांची भूमिका साकारली आहेस’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘माता कुंती तू अशा लूकमध्ये चांगली नाही दिसत…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘शकुनीने पाहिल्यानंतर फोटो सर्वत्र व्हायरल करेल…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘तुला लाज वाटायला हवी… छोट्या पडद्यावर माता कुंती यांची भूमिका साकारली आहेस…’ अशा कमेंट अभिनेत्रीच्या फोटोंवर येत आहेत.
शफक नाझ हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘महाभारत शिवाय ‘चिडिया घर’, ‘चिठ्ठी’, ‘एक्स ओर व्हाय’, ‘संस्कार लक्ष्मी’ यांसारख्या अनेक प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर शफक हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रावर शफक हिचे 835K फॉलोअर्स आहेत. तर अभिनेत्री फक्त 194 नेटकऱ्यांनी फॉलो करते.