Video | पत्नी गौरी हिच्यासमोर भीतीने थरथर कापताना दिसला शाहरुख खान, व्हिडीओ पाहून चाहत्यांना बसला मोठा धक्का

| Updated on: Jun 18, 2023 | 6:55 PM

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याच्या आगामी चित्रपटाच्या सेटवरील काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. जवान चित्रपटात शाहरुख खान हा मुख्य भूमिकेत असून जबरदस्त लूक शाहरुख खान याचा व्हिडीओमध्ये दिसत होता.

Video | पत्नी गौरी हिच्यासमोर भीतीने थरथर कापताना दिसला शाहरुख खान, व्हिडीओ पाहून चाहत्यांना बसला मोठा धक्का
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शाहरुख खान याचे एका मागून एक असे चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला पठाण हा चित्रपट धमाका करताना दिसला. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हाच चित्रपट (Movie) ठरलाय. शाहरुख खान हा पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या पडद्यापासून तब्बल चार वर्षे दूर होता. शाहरुख खान परत कधी बाॅलिवूड (Bollywood) चित्रपटामध्ये दिसणार की, नाही याची चिंता त्याच्या चाहत्यांमध्ये सतत बघायला मिळत होती. शेवटी पठाण चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बाॅलिवूडमध्ये पुनरागमन केले आहे.

शाहरुख खान हा त्याच्या फक्त चित्रपटांमुळेच नाही तर त्याच्या पर्सनल लाईफमुळेही कायम चर्चेत असतो. शाहरुख खान हा पत्नी गाैरी खान हिच्यावर प्रचंड प्रेम करतो. शाहरुख खान आणि गाैरी खान यांना तीन मुले आहेत. गाैरी खान ही देखील सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते. गाैरी खान हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते.

नुकताच शाहरुख खान आणि गाैरी खान यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये समुद्राच्या किनारी भरधाव वेगात गाैरी खान ही गाडी चालवताना दिसत आहे. विशेष म्हणजे गाैरी खान हिच्यामागे शाहरुख खान हा बसलेला दिसत आहे. मात्र, शाहरुख खान हा खूप जास्त घाबरलेला दिसतोय.

शाहरुख खान हा गाैरी खान हिला सतत गाडी हळू चालवण्याचा सल्ला देताना दिसतोय. शाहरुख खान हा गाैरीच्या मागे बसतो आणि गाैरी मला खूप जास्त भीती वाटत असल्याचे देखील म्हणताना दिसतोय. शाहरुख खान म्हणतो की, मी स्टंट करू शकतो. परंतू इतक्या जास्त स्पीडच्या गाडीवर अजिबातच बसू शकत नाही. मला भिती वाटते. शाहरुख खान हा चक्क या व्हिडीओमध्ये भीतांना दिसतोय.

शाहरुख खान सतत गाैरीला गाडीचा वेग कमी ठेवण्याचे सांगत आहे. यावेळी सुहाना खान देखील आपल्याला गाडीवर बसायचे असल्याचे म्हणताना दिसत आहे. यावेळी शाहरुख खान म्हणतो की, तू जा तुझ्या आईसोबत त्यावेळी परत एकदा गाडीचा वेग कमी ठेवण्याचा सल्ला गाैरी हिला देताना शाहरुख खान दिसतोय. भरधाव वेगात गाडी चालवताना गाैरी दिसत आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय.