मुंबई : अभिनेता शाहरुख खान सध्या ‘पठाण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. प्रदर्शनाच्या पूर्वी वादाच्या भोवऱ्या अडकलेल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फक्त ६ दिवसांमध्ये ६०० कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे. सिनेमा रोज नवीन विक्रम रचत असताना अभिनेत्याच्या पुढच्या सिनेमाची चर्चा जोर धरत आहे. शाहरुख ‘पठाण’ सिनेमाच्या यशानंतर ‘डंकी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. शाहरुखच्या आगामी सिनेमाबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. शाहरुख याच्यासोबत ‘डंकी’ सिनेमात ‘बिग बॉस 16’ फेम प्रियंका चहर चौधरी झळकणार असल्याची चर्चा आहे.
‘डंकी’ सिनेमात शाहरुख खानसोबत जर ‘बिग बॉस 16’ फेम प्रियंका चहर चौधरी झळकली तर तिचं भाग्य उजळेल असं म्हणायला हरकत नाही. मिळालेल्या माहितीनुसार निर्माते राजकुमार हिरानी सिनेमासाठी एका पंजाबी मुलीच्या शोधात आहे. अशात ‘बिग बॉस १६’ मुळे प्रियंका तुफान चर्चेत आहे. प्रियंकाचं भविष्य उज्वल असेल.. असं वक्तव्य खु्द्द काही दिवसांपूर्वी सलमान खान याने केलं होतं.
अशात शाहरुख खान स्टारर ‘डंकी’ सिनेमात प्रियंका मोठ्या पडद्यावर झळकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पण याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सांगायचं झालं तर, ‘डंकी’ सिनेमात शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र शाहरुखच्या ‘डंकी’ आणि सिनेमात प्रियंकाच्या एन्ट्रीबद्दल चर्चा रंगत आहे.
‘बिग बॉस 16’ स्पर्धक प्रियंका चहर चौधरी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती घरातील दमदार सदस्यांपैकी एक आहे. ‘बिग बॉस 16’ मध्ये एन्ट्री केल्यानंतर प्रियंका चहर चौधरीच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. सलमान खान याच्या वक्तव्यानंतर प्रियंकाच्या चाहत्यांना तिला मोठ्या पडद्यावर पाहायचं आहे. त्यामुळे शाहरुखच्या ‘डंकी’ सिनेमात प्रियंका हिला संधी मिळाली तर तिच्या आयुष्यातील तो मोठा बदल असणार आहे.
यंदाचं ‘बिग बॉस 16’ मैत्री, भांडणं, प्रेम इत्यादी गोष्टीमुळे चर्चेत आहे. सध्या ‘बिग बॉस 16’ चा प्रत्येक स्पर्धक फायनलमध्ये जाण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. ‘बिग बॉस 16’ नंतर सेलिब्रिटींच्या करियरमध्ये मोठे बदल होतात असं म्हणतात. तर फायनलच्या आधीच निमृत कौर पासून शालीन भनोट यांच्यापर्यंत अनेकांना नवीन प्रोजेक्ट मिळाले आहेत. तर प्रियंका देखील शाहरुखच्या सिनेमात झळकणार असल्याची चर्चा आहे.