शाहरुख खान थेट अबरामच्या शाळेत, जमिनीवर बसून लेकाला एकटक पाहातच राहिला

| Updated on: Feb 20, 2024 | 12:35 PM

Shah Rukh Khan : लेक अबराम याच्या शाळेत शाहरुख खान याची हजेरी, किंग खानला पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण, लेका गीटार वाजवताना पाहून अभिनेता आनंदी... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किंग खान आणि अबराम खान यांची चर्चा

शाहरुख खान थेट अबरामच्या शाळेत, जमिनीवर बसून लेकाला एकटक पाहातच राहिला
Follow us on

मुंबई | 20 फेब्रुवारी 2024 : अभिनेता शाहरुख खान फक्त उत्तम अभिनेताच नाही तर, एक प्रेमळ आणि जबाबदार वडील देखील आहे. स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी शाहरुख खान कायम मुलांना प्रेरणा देताना दिसतो. आता देखील अभिनेता लहान मुलगा अबराम खान याच्या शाळेत पोहोचला. धीरूभाई अंबानी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात अभिनेता उपस्थित होता. शाहरुख खान याच्या फॅनपेजवर काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. फोटोंमध्ये प्रत्येक विद्यार्थी किंग खान याला ऐकताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये अबराम खान गिटार वाजवताना दिसत आहे.

सांगायचं झालं तर, शाहरुख खान याने अनेक फॅन पेज आहे. जे कायम अभिनेत्याचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. आता अभिनेत्याच्या फॅन पेजवर शाहरुख खान याचे काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. शाळेच्या एका कार्यक्रमात अभिनेत्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं होतं.

हे सुद्धा वाचा

 

 

सध्या किंग खान याचे शाळेतील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शाळेत पोहोचल्यानंतर शाहरुख खान याने विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारल्या, त्यांच्यासोबत अनेक खेळ खेळला. एवढंच नाही तर, किंग खान याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केलं. एका फोटोमध्ये किंग खान मुलासोबत दिसत आहे.

शाहरुखप्रमाणेच लोकांना त्याची मुलेही खूप आवडतात. अबराम हा सगळ्यात जास्त लोकप्रिय आणि प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अबराम गिटार वाजवताना दिसत आहे. अबराम कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गैरी खान आणि शाहरुख खान यांचा लहान मुलगा अबराम सध्या पाचवी इयत्तेत शिकत आहे.

शाहरुख खान कायम मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान यांच्याबद्दल देखील सांगत असतो. आर्यन खान याने करियरला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे, सुहाना हिने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सुहाना देखील कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

शाहरुख खान याचा आगामी सिनेमा

शाहरुख खान याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, किंग खान ‘किंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात शाहरुख खान याच्यासोबत लेक सुहाना खान देखील महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा रंगत आहे. पण यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याची चर्चा रंगली आहे.