शाहरुख खानचा धर्माबद्दल मोठा खुलासा; म्हणाला, ‘आर्यन गायत्री मंत्र म्हणतो आणि मी…’

| Updated on: Sep 09, 2024 | 8:50 AM

Shah Rukh Khan: मुलांना धर्माबद्दल काय सांगतो शाहरुख खान? मुलाखतीत केला मोठा खुलासा, किंग खान म्हणाला, 'आर्यन गायत्री मंत्र म्हणतो आणि मी...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याच्या वक्तव्याची चर्चा...

शाहरुख खानचा धर्माबद्दल मोठा खुलासा; म्हणाला, आर्यन गायत्री मंत्र म्हणतो आणि मी...
Follow us on

अभिनेता शाहरुख खान कायम त्याच्या प्रोफेशनल आणि खासगी खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. अनेकदा अभिनेत्याने स्वतःच्या धर्माबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. किंग खान सर्व धर्मातील सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. ‘मी मुसलमान माझी पत्नी हिंदू आणि आमची मुलं हिंदुस्तान आहेत…’ असं एका कार्यक्रमात शाहरुख खान म्हणाला होता. शिवाय ‘आर्यन गायत्री मंत्र म्हणतो तेव्हा मी बिस्मिल्लाह म्हणतो…’ असं देखील अभिनेता म्हणाला होता.

सांगायचं झालं तर, 2004 मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात शाहरुख खान याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. तेव्हा एका व्हिडीओमध्ये शाहरुखच्या आयुष्यातील खास क्षण देखील दाखवण्यात आले होते. व्हिडीओमध्ये शाहरुख खान दिवाळीत पूजा करताना दिसला. अभिनेता म्हणाला होता, ‘माझ्या घरी मंदिरात कुरान देखील आहे.’

 

शाहरुख म्हणाला होता, ‘मुलांना देव आणि त्यांचं महत्त्व कळलं पाहिजे… मग ते देव हिंदू असो किंवा मुस्लीम. माझ्या घरी गणेश लक्ष्मी यांच्या बाजूला आमच्या येथे कुरान देखील आहे. आम्ही हात जोडतो. आर्यन गायत्री मंत्र म्हणतो तोव्हा त्यांच्यासोबत मी बिस्मिल्लाह म्हणतो…’

‘मला धर्माबद्दल फार काही माहिती नाही. पण मी मुलांना धर्माबद्दल कायम सांगत असतो.’ असं देखील अभिनेता म्हणाला होता. ‘दिवसाला पाच वेळा नमाज पठण केलंच पाहिजे… असा दबाव माझ्या आई-वडिलांनी कधीच माझ्यावर टाकला नाही.’ असं देखील शाहरुख म्हणाला होता.

 

 

धर्माबद्दल गौरी खान हिचं मोठं वक्तव्य

गौरी खान म्हणाली होती, ‘मी शाहरुख खानच्या धर्माचा सन्मान करते. पण याचा अर्थ असा होत नाही की, मी माझा धर्म बदलून मुस्लीम धर्म स्वीकारणार नाही.’ असं गौरी म्हणाली होती. शाहरुख खान म्हणाला होता, ‘माझ्यासाठी घरात दिवाळी आणि ईद होणं अत्यंत गरजेचा आहे. आम्ही ख्रिश्चन धर्म देखील मानतो… आम्ही ट्री देखील लावतो…’ असं देखील शाहरुखा खान म्हणाली होती.