Shah Rukh Khan: बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्याच्या यादीत किंग खान अव्वल स्थानी आहे. किंग खान बद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक अभिनेत्रींसोबत शाहरुखने स्क्रिन शेअर केली. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत शाहरुखच्या लिंकअपच्या चर्चा रंगल्या नाहीत. काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत शाहरुखला कोणत्याही अभिनेत्रीसोबत अफेअरच्या अफवा न पसरवण्याबाबत विचारण्यात आलं होतं, तेव्हा त्याने दिलेल्या उत्तराने सगळेच आश्चर्यचकित झाले होते.
एका मुलाखतीदरम्यान शाहरुख खानला जेव्हा विचारण्यात आले की, इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत त्याचं नाव कोणत्याही अभिनेत्रीसोबत का जोडलं गेलं नाही, तेव्हा किंग खान म्हणाला, ‘मला असं वाटतं की मी गे आहे. मला अनेकांनी विचारलं आहे तुझ्या नावाची चर्चा कोणत्याच अभिनेत्रीसोबत का रंगली नाही. त्या सर्व माझ्या मैत्रीणी आहे. मी कायम हेच उत्तर देतो…’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘मी त्यांच्यासोबत काम करतो. मी माझ्या पत्नीसोबत खूप आनंदी आहे आणि सर्व मुलींसोबत मी फक्त काम करतो. मी त्या सर्वांवर प्रेम करतो. शुटिंग दरम्यान त्यांच्यासोबत अधिक वेळ देखील व्यतीत करतो. अभिनेत्री माझ्या घरी येतात. मी त्यांच्या घरी जातो. आम्ही एकमेकांना मदत करत असतो…’ असं देखील अभिनेता म्हणाला होता.
2011 मध्ये शाहरुखचं प्रियांका चोप्रासोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. डॉन सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात जवळीक वाढल्याचं अनेकदा सांगण्यात आलं. नाईटक्लब, पार्ट्या आणि विविध कार्यक्रमांमध्ये दोघांना वारंवार एकत्र दिसल्याने अफवांना आणखी उधाण आले. पण रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही.. असं खुद्द अभिनेता म्हणाला होता.
शाहरुख खानच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘किंग’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्री सुहाना खान देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. किंग खान पहिल्यांदा लेकीसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. चाहते देखील किंग खानच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत.