बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान यांची लेक सुहाना खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सुहाना खान लवकरच वडिलांसोबत ‘किंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. पण आता सुहाना तिच्या आगामी सिनेमामुळे नाहीतर, सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. सुहाना हिने एक व्हिडीओ पोस्ट करत ‘मी ब्रेकअप केलंय…’ असं लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर चर्चित बॉयफ्रेंडच्या आईने देखील कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.
सुहाना खान हिच्या बॉयफ्रेंडबद्दल सांगायचं झालं तर, महानायक अमिताभ बच्चन यांचे नातू अगस्त्य नंदा याच्यासोबत सुहाना रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. दरम्यान, सुहाना हिने एका जाहिरातीचा व्हिडीओ पोस्ट केली आहे.
जाहिरातीचा व्हिडीओ पोस्ट करत सुहाना हिने कॅप्शनमध्ये, ‘माझ्याकडे एक बातमी आहे, मी ब्रेकअप केलंय…’ असं लिहिलं आहे. पुढे सुहाना म्हणते, ‘माझ्या साबणासोबत ब्रेकअप केलं आहे…’ सुहाना हिने एका शॉव्हर जेलची जाहिरात केली आहे. अभिनेत्रीच्या व्हिडीओ अगस्त्य याची आई श्वेता बच्चन हिने देखील कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.
सुहाना आणि अगस्त्य यांच्या नात्याबद्दल अद्याप कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शिवाय दोघांनी देखील त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. दोघांनी ‘द अर्चिस’ सिनेमातून अभिनय विश्वात पदार्पण केलं. सिनेमानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला..
सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. आता सुहाना ‘किंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीय येणार आहे. सिनेमाची शुटिंग लंडन याठिकाणी होणार आहे. सुहाना कायम तिच्या कामाबद्दल मोठे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते.
सुहाना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सुहाना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. शाहरुख खान याची लेक असल्यामुळे देखील सुहाना चर्चेत असते. चाहते देखील सुहाना हिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.