मुंबई : 27 नोव्हेंबर 2023 | बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील अभिनेता चर्चेत आला आहे, पण स्वतःच्या सिनेमामुळे किंवा इतर कोणत्या गोष्टीमुळे नाही तर, किंग खान लेक सुहाना खान हिच्यामुळे तुफान चर्चेत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुहाना खान हिची चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर सुहाना खान हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सुहाना महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. सुहाना आणि अगस्त्य यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, दिग्दर्शिका झोया अख्तर दिग्दर्शित ‘द अर्चिस’ सिनेमाच्या माध्यमातून सुहाना, अगस्त्य यांच्यासोबत खुशी कपूर आणि इतर नवे कलाकार देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सिनेमातील स्टारकास्ट आगामी सिनेमाचं जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत.
दरम्यान, मुंबईत देखील ‘द अर्चिस’ सिनेमाचा एक कार्यक्रम पार पडला.. यावेळी सुहाना आणि अगस्त्य यांना डान्स केला. दोघांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सुहाना आणि अगस्त्य अनेकांना आवडला, तर काही नेटकऱ्यांनी मात्र सुहाना खान हिच्यावर निशाणा साधला आहे.
सोशल मीडियावर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘मीडिया आणि पापाराझींसमोर सुहाना कायम घाबरते आणि चिंतेत दिसते. तिला शांत राहायला पाहिजे आणि स्वतःच्या कामाचा आनंद घ्यायला पाहिजे..’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मला नाही वाटत सुहाना खान हिला अभिनय येतं..’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘शाहरुख भाई कृपा कर आणि हिला घरी बसव…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुहाना खान हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
‘द अर्चिस’ सुहाना खान हिचा पहिलाच सिनेमा आहे. सिनेमात अनेक स्टारकिड्स भूमिका बजावताना दिसणार आहेत. ‘द अर्चिस’ सिनेमानंतर सुहाना वडील शाहरुख खान याच्यासोबत देखील स्क्रिन शेअर करणार असल्याची चर्चा रंगत आहे.
सुहाना खान हिने अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं नसलं तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील सुहाना हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.