मुंबई : अभिनेता शाहरुख खान स्टारर पठाण सिनेमाने आतापर्यंत अनेक नवीन रेकॉर्ड केले आहे. प्रदर्शनापूर्वी ‘बेशर्म रंग’ गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे तुफान वातावरण तापलं. पण त्याचा कोणताही परिणाम सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर दिसून आला नाही. एवढंच नाहीतर, सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकारांनी कोणतीही मुलाखत दिली नाही. यादरम्यान ट्विटरवर #askSRK सेशनच्या माध्यमातून अभिनेता थेट चाहत्यांच्या संपर्कात होता. #askSRK सेशन दरम्यान चाहत्यांनी किंग खानला अनेक प्रश्न विचारले. अभिनेत्याने देखील चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर मजेशीर अंदाजात दिली.
नुकताच शाहरुख खान याने #askSRK सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला. या सेशन दरम्यान अभिनेत्याने दिलेली उत्तरं जाणून तुम्ही देखील पोट धरुन हसाल. #askSRK सेशन दरम्यान एक चाहता कमेंट करत म्हणाला, ‘पाच वेळा पठाण पाहण्यासाठी गेलो, ७०० कोटी रुपयांमधून १ कोटी रुपये तरी द्या…’, चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुख खान याने शेअर मार्केटचं उदाहरण दिलं.
Bhai itna rate of return nahi milta not even on share market. See it a few times more then let’s see…ha ha #Pathaan https://t.co/HUOh4sTKWY
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 4, 2023
चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना किंग खान ट्विट करत म्हणाला, ‘भाई इतकं रिटर्न तर शेअर मार्केट देखील देत नाही… सिनेमा आणखी अनेक वेळा बघ… नंतर विचार करू..’ चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर अभिनेत्याने अशाप्रकारे मजेशीर अंदाजात दिलं. सध्या अभिनेत्याचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र किंग खान याच्या #askSRK सेशनची चर्चा रंगत आहे.
किंग खान याने अशा अनेक चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली आहे. चाहते देखील मोठ्या उत्साहाने किंग खान याला प्रश्न विचारत आहेत. अभिनेत्याचा हा विनोदी अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. पठाण सिनेमामुळे अभिनेता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत आहे. चार वर्षांनंतर अभिनेत्याने पुन्हा मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्यामुळे शाहरुख याला मोठ्या पडद्यावर पहण्यासाठी चाहते उत्सुक होते.
पठाण सिनेमाने प्रदर्शनानंतर ९ दिवसांत ७०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. तर विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार दहाव्या दिवशी सिनेमाने भारतात जवळपास १५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. नव्या दिवशी सिनेमाने १५ ते १६ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. पहिल्या पाच दिवसांत सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले. सध्या सर्वत्र पठाण सिनेमाची चर्चा आहे.
सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनी साकारलेल्या भूमिकांची देखील चर्चा रंगत आहे. पठाण सिनेमात दीपिका जबरदस्त अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे. शिवाय सलमान खानची एक अप्रतिम कॅमिओ भूमिका चाहत्यांच्या मनात घर करत आहे. म्हणून पुन्हा मोठ्या पडद्यावर शाहरुख आणि सलमान खान यांना पाहणं चाहत्यांसाठी खास आहे.