आर्यन खान ड्रग्स केसवर पहिल्यांदा शाहरुख खानने सोडलं मौन; म्हणाला, ‘वाईट काळात आम्ही…’

| Updated on: Sep 30, 2024 | 7:56 AM

Shah Rukh Khan on Aryan Khan Case: 'वाईट काळात आम्ही...', आर्यन खान ड्रग्स प्रकरणार 1 महिना होता तुरुंगात, अखेर 'त्या' दिवसावर शाहरुख खान याने सोडलं मौन..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याच्या वक्तव्याची चर्चा...

आर्यन खान ड्रग्स केसवर पहिल्यांदा शाहरुख खानने सोडलं मौन; म्हणाला, वाईट काळात आम्ही...
Follow us on

Shah Rukh Khan on Aryan Khan Case: बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान सध्या ‘आयफा अवॉर्ड 2024’ मुळे चर्चेत आहे. सध्या अभिनेत्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा शाहरुख खान आणि त्याचं कुटुंब वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. 2021 मध्ये शाहरुख खान याचा मोठा मुलगा आर्यन खान याचा ड्रग्स केस प्रकरणार अटक करण्यात आली होती. पूर्ण एक महिना आर्यन तुरुंगात होता. आर्यन खान कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळे खान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. यावर शाहरुख खान कधीच काहीही बोलला नव्हता.

पण नुकताच झालेल्या ‘आयफा अवॉर्ड 2024’ मध्ये अभिनेत्याने आर्यन खान याच्या ड्रग्स केसबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, जेव्हा किंग खान याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आलं तेव्हा त्याने मनातील भावना व्यक्त केल्या. सध्या शाहरुख खान याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होत आहे.

 

 

‘जवान’ सिनेमासाठी पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करत शाहरुख खान म्हणाला, ‘मी फार क्वचित माझ्या खासगी आयुष्यावर बोलत असतो. पण हा (जवान) सिनेमा माझ्यासाठी खास आहे. जेव्हा सिनेमाची शुटिंग सुरु होती. तेव्हा आम्ही वाईट गोष्टींचा सामना करत होतो…’ असं म्हणत शाहरुख खान याने नाव न घेता आर्यन खान केसवर वक्तव्य केलं.

दरम्यान, शाहरुख खान याने जवळच्या व्यक्तींचे आभार देखील मानले. पत्नी गौरी खान, मॅनेजर पूजा ददलानी आणि ‘जवान’ सिनेमाच्या पूर्ण टिमचे अभिनेत्याने आभार मानले. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर चाहते देखील लाईक्स कमेंट करत प्रेम व्यक्त करत आहेत.

आर्यन खान ड्रग्स केस

NCB ने 2021 मध्ये क्रूझ जहाजावर छापा टाकला होता. यामध्ये शाहरुख खान याचा मुलगा आर्यनही ड्रग्ज प्रकरणात अडकला होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर जवळपास 1 महिना आर्यन तुरुंगात होता. अखेर आर्यनला मे 2023 मध्ये या प्रकरणात क्लीन चिट मिळाली.

तीन सिनेमांमध्ये शाहरुख खान याने मारली बाजी

2023 हे वर्ष शाहरुख खान याच्यासाठी फार खास ठरलं. ‘पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्याने चार वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘जवान’ सिनेमा प्रदर्शित झाला. ‘जवान’ सिनेमाने देखील जगभरात नवे विक्रम रचले. त्यानंतर किंग खान ‘डंकी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला.