सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि गौरी खान (Gauri Khan) यांची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सुहाना खान हिचा आज वाढदिवस असल्यामुळे चाहते आणि अनेक सेलिब्रिटी देखील सुहाना हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर देखील सुहाना कायम सक्रिय असते. डिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत सुहाना देखील बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. ‘द अर्चिस’ सिनेमातून सुहाना हिने अभिनय विश्वात पदार्पण केलं आहे.
सुहाना खान तिच्या संपत्तीमुळे देखील कायम चर्चेत असते. जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता शाहरुख खान याची लेक असल्यामुळे सुहाना हिने देखील तिच्या करियरला दमदार सुरुवात केली आहे. सुहाना फक्त सिनेमे आणि जाहिरातींमधून नाहीतर, इतर मार्गांनी देखील कोट्यवधींची कमाई करते.
मिळालेल्या माहितीनुसार, सुहाना खान हिची संपत्ती फक्त भारतात नाहीतर, परदेशात देखील आहेय न्यूयॉर्कमध्ये सुहाना हिचं आलिशान घर आहे. सुहाना हिच्या न्यूयॉर्कमधील घराची किंमत जवळपास 35 कोटी रुपये आहे.. असं सांगितलं जातं. एवढंच नाहीतर, काही दिवसांपूर्वी सुहाना हिने आलिबाग याठिकाणी जमीन देखील खरेदी केली आहे. ज्याची किंमत 10 कोटी आहे.
सुहाना खान अभिनय विश्वात पदार्पणापूर्वीच एका ब्यूटी प्रॉडक्टची ब्रँड ॲम्बेसेडर बनली आहे. सुहाना प्रसिद्ध ब्रँड Maybelline चा चेहरा आहे. ज्यामधून अभिनेत्री कोट्यवधी रुपयांची कमाई करते. वयाच्या 24 व्या वर्षी सुहाना खान गडगंज संपत्तीची मालकीण झाली आहे.
सुहाना खान हिच्या नेट वर्थबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री 13 कोटी रुपयांची मालकीण आहे. शिवाय सुहाना हिच्याकडे रेंज रोव्हर आणि लॅम्बोर्गिनी सारख्या महागड्या कार देखील आहेत. सुहाना लवकरच ‘किंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सुहाना पहिल्यांदा वडील शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
सोशल मीडियावर देखील सुहाना कायम सक्रिय असते. किंग खान याची लेक असल्यामुळे सुहानाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते