बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. शाहरुख खान याच्यासाठी 2023 हे वर्ष अत्यंत चांगले ठरले. कारण त्याचे एका मागून एक चित्रपट रिलीज होताना दिसले आणि या चित्रपटांनी मोठा धमाका केला. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच डंकी हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रेम दिले. शाहरुख खान याचा 2018 मध्ये झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता आणि तो चित्रपट फ्लॉप गेला. झिरो चित्रपट फ्लॉप गेल्यापासून शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर गेला होता. शेवटी त्याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून पुनरागमन केले.
शाहरुख खान हा सतत चर्चेत असणारा बॉलिवूड अभिनेता आहे. शाहरुख खान याच्या देवदास चित्रपटाने तर मोठा धमाका केलाय. देवदास चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्यासोबत माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय या देखील मुख्य भूमिकेत होत्या. हा एक सुपरहिट चित्रपट ठरला. देवदासला प्रेक्षकांनी मोठे प्रेम देखील दिसले.
शाहरुख खान याच्याकडून आता देवदास चित्रपटाबद्दल अत्यंत मोठा खुलासा करण्यात आलाय. शाहरुख खान म्हणाला की, लोकांना वाटते की, देवदास चित्रपटासाठी मी खूप जास्त मेहनत घेतलीये. या चित्रपटाच्या भूमिकेसाठी मी कित्येक रात्र फक्त दारू पित बसायचो. मी रात्री दारू प्यायचो आणि एका रात्री माधुरी डान्स करायची आणि दुसऱ्या रात्री ऐश्वर्या राय.
मी त्यावेळी मिस्टर जॅकी श्रॉफसोबत दारू प्यायचो. लोक म्हणायचे की, या चित्रपटासाठी मी खूप मेहनत घेतलीये. मात्र, अर्ध्यापेक्षा अधिक दिवस तर असेच निघून गेले. शाहरुख खान पुढे म्हणाला की, देवदास चित्रपट करणे त्याचा योग्य निर्णय होता. कारण देवदास चित्रपटाला अगोदर त्याने नकार दिला होता. त्यावेळी भंन्साळी यांनीही शाहरुख खानसमोर मोठा खुलासा केला होता.
भंन्साळी यांनी स्पष्ट सांगितले होते की, देवदास करणार तर फक्त शाहरुख खानसोबतच नाही तर नाहीच. शाहरुख खान याला बॉलिवूडचे किंग म्हटले जाते. शाहरुख खानने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या डंकी चित्रपटाने अत्यंत मोठा धमाका केला.