शाहरुखच्या 8 पॅक ॲब्स लूकवर मुलीची खास कमेंट; म्हणाली ‘बाबा 56 वर्षांचे आहेत पण..’
बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानने (Shah Rukh Khan) नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला असून त्यावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. आगामी 'पठाण' (Pathaan) या चित्रपटातील त्याचा हा लूक आहे. या शर्टलेस फोटोमध्ये शाहरुखने त्याचे 8 पॅक अॅब्स फ्लाँट केले आहेत. आपल्या या नव्या लूकने शाहरुखने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
1 / 5

2 / 5
गौरी खान, बिपाशा बासू, राशी खन्ना, अमाल मलिक यांसह इतरही सेलिब्रिटींनी शाहरुखच्या या 'हॉट' फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. बिपाशाने 'वॉव' असं लिहिलंय, तर राशीने कमेंट्समध्ये हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. 'Loving the Pathaan vibe' अशी कमेंट पत्नी गौरीने केली आहे.
3 / 5
शाहरुखची मुलगी सुहाना खान हिनेसुद्धा हा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 'माझे बाबा 56 वर्षांचे आहेत.. आम्हाला कोणतीही कारणं देण्याची परवानगी नाही', अशा आशयाचं कॅप्शन तिने लिहिलं आहे. शाहरुखने पठाणमधील लूकचा हा फोटो पोस्ट करत लिहिलं, 'शाहरुख अगर थोडा रुक भी गया तो पठाण को कैसे रोकोगे.. अॅप्स और अॅब्स सब बना डालुंगा'. शाहरुखने नुकताच त्याचा ओटीटी अॅप लाँच केला आणि त्याचाच संदर्भ त्याने या कॅप्शनमध्ये दिला आहे.
4 / 5
'तुझं वय खरंच 56 आहे का', असा सवाल करत नेटकऱ्यांनी त्याच्या लूकवरून आश्चर्य व्यक्त केलं. शाहरुखचा 'पठाण' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमच्या भूमिका आहेत.
5 / 5
2018 मध्ये शाहरुखचा 'झिरो' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्याने मोठा ब्रेक घेतला असून अखेर चार वर्षांनंतर त्याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘झिरो’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला होता. यामध्ये कतरिना कैफ आणि अनुष्का शर्माने शाहरुखसोबत काम केलं होतं.