मुंबई : शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या जवान चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे शाहरुख खान हा जवान चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसला. शाहरुख खान याचा यापूर्वी पठाण हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. विशेष म्हणजे पठाण या चित्रपटाने मोठा धमाका केला. पठाण चित्रपटाने मोठी तगडी कमाई केली. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण चित्रपट ठरला.
विशेष म्हणजे शाहरुख खान याचा जवान चित्रपट रिलीज होऊन आता 16 दिवस झाले. 532.93 कोटींचे कलेक्शन आतापर्यंत जवान चित्रपटाने केले. जवान चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्यासोबत नयनतारा ही मुख्य भूमिकेत दिसली. विशेष म्हणजे प्रेक्षकांना शाहरुख खान आणि नयनतारा यांची जोडी जबरदस्त आवडली. जवान चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळाली.
शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण दिसतंय. नुकताच शाहरुख खान याने आपल्या चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन केले. या सेशनमध्ये शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिसला. यावेळी एका चाहत्याने अत्यंत खास प्रश्न शाहरुखला विचारला.
Baap Baap hota hai..!! No no just joking. He loved the fight with the Big guy….he loved it in the climax. #Jawan https://t.co/q2L3plzaJn
— Shah Rukh Khan (@iamsrk) September 22, 2023
एकाने लिहिले की, तुमचा छोटा मुलगा अबराम याला जवान चित्रपट कसा वाटला? यावर धमाकेदार उत्तर देताना शाहरुख खान याने लिहिले की, बाप बाप असतो…नाही फक्त मजाक करतोय…त्याला मोठ्या लोकांसोबत लढाई आवडली. इतकेच नाही तर त्याला क्लाइमेक्स देखील प्रचंड आवडले. म्हणजेच काय तर शाहरुख खान याच्या मुलाला देखील जवान चित्रपट आवडला.
शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर बाॅलिवूड चित्रपटांमध्ये पुनरागमन हे केले. शाहरुख खान याचे चाहते सतत त्याच्या पुनरागमनाची वाट पाहताना दिसले. शाहरुख खान याच्या चित्रपटाचा जलवा हा बघायला मिळाला. शाहरुख खान याचा आता काही दिवसांमध्येच डंकी हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटाचे शूटिंग करताना काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान हा कश्मीर येथे दिसला.