शाहरुख खानकडे महिला काँग्रेस नेत्याची विनंती, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाल्या, ‘शेवटचा प्रयत्न कारण…’

| Updated on: Jun 16, 2024 | 8:22 AM

Shah Rukh Khan | शाहरुख खानकडे महिला काँग्रेस नेत्याने कोणत्या गोष्टीसाठी केली आहे विनंती? व्हिडीओ पोस्ट करत म्हणाल्या 'शेवटचा प्रयत्न कारण...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याची चर्चा... नक्की काय आहे प्रकरण?

शाहरुख खानकडे महिला काँग्रेस नेत्याची विनंती, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाल्या, शेवटचा प्रयत्न कारण...
शाहरुख खान
Follow us on

अभिनेता शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता काँग्रेसच्या एका महिला नेत्याने किंग खानकडे एक विनंती केली आहे. शाहरुख खानचे शिक्षक एरिक डिसूजा (Eric D’Souza) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे एरिक डिसूजा यांनी अभिनेत्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. सांगायचं झालं तर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव जरिता लैतफलांग यांनी सोशल मीडियावर एका व्हिडीओ पोस्ट करत एरिक डिसूजा यांना भेटण्यासाठी विनंती केली आहे. सध्या सर्वत्र जरिता यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

15 जून रोजी जरिता यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये त्या शाहरुख खानच्या जुन्या शाळेतील शिक्षक एरिक एस. डिसोझा यांच्या आरोग्याबाबत बोलताना दिसत आहेत. तिच्या पोस्टमध्ये, डिसूझा यांची तब्येत “बिघडत आहे” आणि शाहरुखला लवकरच भेटण्याची विनंती केली.

 

 

जरिता म्हणाल्या, ‘शाहरुख खानकडे एक विनंती आहे. जर काही मिनिटांसाठी तू एरिक एस. डिसोझा यांना भेटण्यासाठी येशील तर त्यांना फार बरं वाटेल. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना बोलता देखील येत नाही. मुंबईपासून गोवा फार काही दूर नाही. काही तासांचा प्रवास आहे. शाहरूख पर्यंत पोहोचण्याचा हा माझा शेवटचा प्रयत्न आहे… ‘

‘एरिक एस. डिसोझा यांची प्रकृती दिवसागणिक चिंताजनक होत आहे. त्यामुळे शाहरुखने काही मिनिटांसाठी एरिक एस. डिसोझा यांची भेट घ्यावी अशी विनंती…’ जरिता यांनी आणखी एक व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये एरिक एस. डिसोझा आणि शाहरुख खान दिसत आहे.

 

 

दोघांचा जुना व्हिडीओ पोस्ट करत जरिता म्हणाल्या, ‘ज्या लोकांना वाटतं शाहरुख खान याने एरिक एस. डिसोझा यांना का भेटावं? त्यांच्यासाठी हा व्हिडीओ आहे. एरिक एस. डिसोझा हे शाहरुख खानसाठी अनोळखी नाहीत. एरिक एस. डिसोझा यांनी अनेकांना योग्य मार्ग दाखवला आहे. ते एक शिक्षक होते..’ सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

एरिक एस. डिसोझा आणि शाहरुख खान यांचा व्हिडीओ ‘जीना इसी का नाम है’ शोमधील आहे. व्हिडीओमध्ये शाहरुख खान शिक्षक डिसोझा यांच्याबद्दल बोलताना दिसत आहे. ‘मी कायम बोलत असतो आणि आता देखील बोलतो माझ्यासाठी माझ्या आई-वडिलांनंतर कोणी आहे तर, ते एरिक एस. डिसोझा आहेत…’ सध्या सर्वत्र फक्त एरिक एस. डिसोझा आणि शाहरुख खान यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.