विराट कोहली माझा जावई…, अनुष्काच्या पतीबद्दल असं का म्हणाला शाहरुख खान?

| Updated on: Apr 03, 2024 | 2:47 PM

Shah Rukh Khan | क्रिकेटपटू विराट कोहली याला जावई का म्हणतो शाहरुख खान? अनुष्का शर्मा हिच्यासोबत आहे खास कनेक्शन... इंडस्ट्रीमध्ये अनेक सेलिब्रिटींसोबत अभिनेता शाहरुख खान याचे आहेत खास संबंध... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनुष्का - शाहरुख यांच्या नात्याची चर्चा...

विराट कोहली माझा जावई..., अनुष्काच्या पतीबद्दल असं का म्हणाला शाहरुख खान?
Follow us on

अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली भारतातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटी आहेत. तिघांच्या चाह्त्यांची संख्या फक्त भारतात नाहीतर, साता समुद्रापार देखील फार मोठी आहे. सांगायचं झालं तर, शाहरुख – अनुष्का यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. अनुष्का हिने करियरची सुरुवात शाहरुख स्टारर ‘रब ने बना दी जोडी’ सिनेमातून केली. सोशल मीडियावर देखील शाहरुख – अनुष्का यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

एकदा सर्वांसमोर शाहरुख खान याने विराट कोहली याची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा अनुष्का – विराट एकमेकांना डेट करत होते. तेव्हा एका मुलाखतीत शाहरुख खान याला विचारण्यात आलं, कोणत्या क्रिकेटरची भूमिका साकारायला आवडेल… यावर किंग खान याने विराट कोहली याचं नाव घेतलं.

शाहरुख याने विराटचं नाव घेताच अनुष्का म्हणाली, ‘त्यासाठी तुला दाढी वाढवावी लागेल…’ यावर किंग खान म्हणाला, ‘मी दाढी वाढवलेली आहे… ‘हॅरी मेट सेजल’ सिनेमात मी दाढी वाढवलेली होती. सिनेमात मी विराट याच्यासारखाच दिसत होतो… हुबेहूब विराट सारखा मी दिसत होतो…’ असं देखील शाहरुख म्हणाला.

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यामध्ये घट्ट मैत्री आहे. दोघांनी ‘रब ने बना दी जोडी’, ‘जब तक है जान’, ‘जब हॅरी मेट सेजल’ आणि ‘झिरो’ सिनेमात एकत्र काम केलं आहे. एकदा शाहरुख खान याला आस्क मी सेशन दरम्यान चाहत्यांना विराट याच्याबद्दल विचारलं होतं.

विराट याच्याबद्दल विचारताच किंग खान म्हणाला, ‘माझं विराट याच्यावर प्रचंड प्रेम आहे.. मी कायम त्याच्यासाठी प्रार्थना करत असतो… तो माझ्या जावयासारखा आहे…’ शाहरुख खान याने तेव्हा केलेलं वक्तव्य आजही चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. शाहरुख खान कायम त्याच्या खास अंदाजामुळे चर्चेत असतो.

विराट कोहली – अनुष्का शर्मा

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर विराट कोहली – अनुष्का शर्मा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर 2017 मध्ये दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं. विराट – अनुष्का यांना एक मुलगी वामिका आणि एक मुलगा अकाय आहे… अनुष्का हिने फेब्रुवारी महिन्यात मुलाला लंडन येथे जन्म दिला. सध्या अभिनेत्री लंडनमध्येच आहे.