शाहरुख – सलमानकडून अनंत – राधिका यांना ‘ही’ महागडी वस्तू भेट, किआरा आणि कतरिना देखील नाही राहिल्या मागे

| Updated on: Mar 12, 2024 | 8:19 AM

गेल्या काही दिवसांपासून अंबानी कुटुंब तुफान चर्चेत आहे... शाहरुख खान - सलमान खान यांनी अनंत - राधिका यांनी दिलेली भेटवस्तू प्रचंड महागडी... किआरा आणि कतरिनी यांनी देखील कपलला दिली प्रचंड महागडी वस्टू भेट... जाणून व्हाल हैराण

शाहरुख - सलमानकडून अनंत - राधिका यांना ही महागडी वस्तू भेट, किआरा आणि कतरिना देखील नाही राहिल्या मागे
Follow us on

मुंबई | 12 मार्च 2024 : गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी तुफान चर्चेत आहे. नुकताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सेलिब्रेशन मोठ्या थाटात झाला. प्री-वेडिंगसाठी अनेक सेलिब्रिटी आणि दिग्गज उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांनी अनंत – राधिका यांना नव्या आयुष्याच्या शुभेच्छा तर दिल्याच पण महागड्या भेटवस्तू देखील दिल्या… अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेता सलमान खान यांनी देखील अनंत – राधिका यांनी महागड्या भेटवस्तू दिल्या आहे. सध्या सर्वत्र अनंत – राधिका यांना मिळालेल्या महागड्या भेटवस्तूंची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, फार कमी लोकांनी माहिती आहे की, अनंत अंबानी, शाहरुख खान याला ‘गॉडफादर’ मानतात. तर राधिका किंग खान याला अंकल म्हणून हाक मारते. सोशल मीडियावर राधिका – अनंत यांच्यासोबत शाहरुख खान याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. शाहरुख याने नव्या जोडप्याला शुभेच्छा तर दिल्याच पण महागडी वस्तू भेट म्हणून देखील दिली.

रिपोर्टनुसार, शाहरुख याने राधिका – अनंत यांना भेट म्हणून मर्सिडीज बेंज 300 SLR ही महागडी कार दिली आहे. या कारची किंमत 5 कोटी रुपये असल्याची माहिती समोर येत आहे. तर अन्य एका रिपोर्टनुसार, सलमान खान याने अनंत यांना एक कस्टमाइज्ड वॉच (घड्याळ) आणि राधिका यांनी हिऱ्याचे कानातले दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

कतरिना, किआरा, दीपिका यांनी दिलेली भेटवस्तू…

रिपोर्टनुसार, किआरा अडवाणी हिने राधिका – अनंत यांना प्रचंड खास गोष्ट भेट म्हणून दिली आहे. किआरा हिने राधिका – अनंत यांना भेट म्हणून सोन्याचा मुलामा आणि हिऱ्यांनी जडवलेल्या लक्ष्मी-गणेशाच्या मूर्ती भेट म्हणून देण्यात आल्या आहेत. तर कतरिना – विकी यांनी नव्या जोडप्याला भेट म्हणून ब्रेसलेट दिलं आहे. दीपिका – रणवीर यांनी राधिका – अनंत यांना 1 कोटी रुपयांचा घड्याळ भेट म्हणून दिला आहे.

सेलिब्रिटींनी अंबानी यांच्या पार्टीसाठी घेतलेलं मानधन

सांगायचं झालं तर, अनेक सेलिब्रिटींनी अंबानी यांच्या पार्टीमध्ये परफॉर्म करण्यासाठी मोठी रक्कम घेतली आहे. हॉलिवूड सिंगर रिहानी हिने परफॉर्म करण्यासाठी तब्बल 74 कोटी रुपये घेतले आहेत. तर दिलजीत दोसांझ याने 4 कोटी रुपये घेतले. तर अनंत – राधीका यांच्या पार्टीमध्ये शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी देखील डान्स केला. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त राधिका – अनंत यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनची चर्चा रंगली आहे.