एकनाथ शिंदेंच्या घरी बॉलिवूडचं ‘खान’दान; सलमान-शाहरुखची एकत्र हजेरी

| Updated on: Sep 25, 2023 | 12:52 PM

अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी गणपती दर्शनासाठी पोहोचले. रविवारी या दोघांना मीडियासमोर एकत्र पाहिलं गेलं. सलमान आणि शाहरुख पारंपरिक पोशाखात मुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचले होते. या भेटीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

एकनाथ शिंदेंच्या घरी बॉलिवूडचं खानदान; सलमान-शाहरुखची एकत्र हजेरी
Salman and Shah Rukh with Eknath Shinde
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांनी रविवारी 24 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी भेट दिली. हे दोघं शिंदेंच्या घरातील गणपती पूजेसाठी पोहोचले होते. यावेळी दोघांनी एकनाथ शिंदेंसोबत फोटोसाठी एकत्र पोझ दिले आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या. विविध फॅन पेजेस आणि पापाराझी अकाऊंटवर या भेटीचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावेळी शाहरुखसोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानीसुद्धा होती. तर सलमान खान त्याची बहीण अर्पिता आणि मेहुणा आयुष शर्मासोबत पोहोचला होता. यावेळी बॉलिवूडचा हा ‘खान’दान पारंपरिक वेशभूषेत दिसला होता. शाहरुखने निळ्या रंगाचा पठानी सूट आणि सलमानने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

एकनाथ शिंदे यांच्या घरी गणपती पूजेसाठी बॉलिवूडमधील इतरही सेलिब्रिटी पोहोचले होते. यामध्ये जॅकी श्रॉफ, अर्जुन रामपाल, आशा भोसले, बोनी कपूर, रश्मी देसाई यांचाही समावेश होता. याआधी सलमान आणि शाहरुख हे ‘पठाण’ चित्रपटात एकत्र ऑनस्क्रीन झळकले होते. या चित्रपटातील दोघांच्या ॲक्शन सीनने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. आता ही जोडी लवकरच पुन्हा एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

शाहरुख खान आणि सलमान खान ही सुपरहिट जोडी आता एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘टायगर वर्सेस पठाण’ या चित्रपटात किंग खान आणि बॉलिवूडचा भाईजान हे एकमेकांसमोर येणार आहेत. मार्च 2024 मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. ‘टायगर वर्सेस पठाण’ या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करणार आहे. शाहरुख आणि सलमान यांना वेगवेगळ्या मीटिंगमध्ये बोलावून त्यांना कथा ऐकवण्यात आली होती. त्यानंतर दोघांनीही एकत्र काम करण्यास होकार दिला आहे. बॉलिवूडचे दोन मोठे स्टार्स या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. याचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहेत.