Shah Rukh Khan | शाहरुख खान याने केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक, सोशल मीडियावर अभिनंदन करत म्हणाला

| Updated on: Sep 10, 2023 | 7:01 PM

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट तूफान अशी कामगिरी करताना दिसतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत. शाहरुख खान याच्या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे.

Shah Rukh Khan | शाहरुख खान याने केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक, सोशल मीडियावर अभिनंदन करत म्हणाला
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आहे. शाहरुख खान याचे चित्रपट एका मागून एक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान याचे चित्रपट (Movie) मोठा धमाका करताना देखील दिसत आहेत. नुकताच शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाने मोठी कामगिरी करण्यास सुरूवात केलीये. शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून जवान या चित्रपटाचे काैतुक करतानाही दिसला.

शाहरुख खान याच्या जवान या चित्रपटाबद्दल फक्त चाहत्यांमध्ये क्रेझ नाहीये तर बाॅलिवूड कलाकारांमध्येही मोठी क्रेझ आहे. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला पठाण हा चित्रपट मोठी कमाई करताना दिसला. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हाच चित्रपट ठरलाय. या चित्रपटाने मोठी कामगिरी केली.

भारतामध्ये G20 शिखर परिषद हे सध्या दिल्ली येथे सुरू आहे. भारताने G20 शिखर परिषद यशस्वी करून दाखवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पोस्ट या G20 ची सोशल मीडियावर शेअर केली. हिच पोस्ट रिशेअर करत शाहरुख खान याने मोठे भाष्य करत नरेंद्र मोदी यांचे आभार मानत थेट काैतुकही केले आहे.

शाहरुख खान याने म्हटले की, भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या यशाबद्दल आणि जगातील लोकांच्या चांगल्या भविष्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन. यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात आदर आणि अभिमानाची भावना निर्माण झालीये. सर, तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही एकाकी नाही तर एकात्मतेने समृद्ध होऊ… एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य…

आता शाहरुख खान याने शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. शाहरुख खान याच्या या पोस्टवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. शाहरुख खान हा जवान चित्रपट रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे शाहरुख खान हा सेशनच्या माध्यमातून देताना दिसला.