मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. पण आता सेलिब्रिटी त्यांच्या संपत्तीमुळे चर्चेत आले आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या लग्झरी लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतात. महागडी घरं, महागड्या गाड्या, महागडे कपडे… इत्यादी गोष्टींमुळे सेलिब्रिटी चर्चेत असतात. झगमगत्या विश्वात काही असे सेलिब्रिटी देखील आहेत, ज्यांची परदेशात देखील गडगंज संपत्ती आहे. ज्यांचे परदेशात आलिशान व्हिला आहेत. तर आज घेऊया कोणत्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी परदेशातही त्यांचे बंगले खरेदी केले आहेत. सध्या सर्वत्र बॉलिवूड सेलिब्रिटींची चर्चा रंगली आहे.
अभिनेता शाहरुख खान | या यादीत पहिलं नाव बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याचं आहे. शाहरुख याचा दुबईत एक आलिशान बंगला आहे. शाहरुख खान याच्या दुबईतील घराचे नाव ‘जन्नत’ आहे. दुबईच्या पाम जुमेराह येथे त्याचा एक अतिशय आलिशान व्हिला आहे, ज्याची किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे. शाहरुखचा दुबईतील बंगला देखील अत्यंत आलिशान आणि महारड्या वस्तूंनी सजलेला आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी | या यादीमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचं नाव देखील अव्वल स्थानी आहे. दुबई येथील पॉश परिसरात अभिनेत्रीचा आलिशान बंगला आहे. शिल्पा हिचा दुबईतील बंगला अत्यंत आलिशान आणि महारड्या वस्तूंनी सजलेला आहे. शिल्पा कायम सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी दुबईत येच असते. अभिनेत्रीच्या बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या राय | ऐश्वर्या राय हिचं देखील दुबई याठिकाणी आलिशान बंगला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सँक्चुरी फॉल्समध्ये ऐश्वर्याचा आलिशान आणि सुंदर बंगला आहे. ऐश्वर्या अनेकदा तिच्या कुटुंबासह दुबईला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जाते. मुंबईमध्ये देखील अभिनेत्रीची गडगंज संपत्ती आहे.
अभिनेता अनिल कपूर | या यादीत अनिल कपूरच्या नावाचाही समावेश आहे. अनिल कपूर देखील कायम दुबईला जात असतो. त्याने दुबईत स्वतःचं घरही विकत घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कपूरचा राइट्स बाय डेब्यू हाउसिंग प्रोजेक्टमध्ये स्वतःचा 2 bhk अपार्टमेंट आहे.
या यादीमध्ये अनक सेलिब्रिटींचा समावेश आहे. राखी सावंत, सलमान खान, सोहेल खान, तेजस्वी प्रकाश यांची देखील दुबई याठिकाणी संपत्ती आहे. सध्या सर्वत्र सेलिब्रिटींच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे.