Shah Rukh Khan Son Abram Income: अभिनेता शाहरुख खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. किंग खान पत्नी गौरी खान देखील इंटेरियर क्षेत्रात अव्वल स्थानी आहे. आता शाहरुख खान याची तीन मुलं देखील इंडस्ड्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान क्लोदिंग ब्रँडचा मालक आहे. तर, लेक सुहाना हिने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तर लहान मुलगा आबराम खान याने देखील कमाई करण्यास सुरुवात केली आहे.
सांगायचं झालं तर, आर्यन खान आणि सुहाना खान यांना यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी किंग खान सर्व प्रयत्न करत आहे. तर या शर्यतीत शाहरुख खान याचा लहान मुलगा देखील मागे नाही. वयाच्या 11 व्या वर्षीच आर्यन खान याने कमाई करण्यास सुरुवात केली आहे.
अबराम याने इतक्या लहान वयात लखोंची कमाई कशी केली असेल? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. तर अबराम याने ‘मुफासा द लॉयन किंग’ सिनेमातील बेबी मुफासाच्या भूमिकेसाठी डबिंग केलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमासाठी फक्त अबराम यानेच नाही तर, शाहरुखने मुफासाच्या भूमिकेसाठी आणि आर्यन खान याने सिनेमातील सिम्बा भूमिकेला स्वतःचा आवज दिला आहे.
बेबी मुफासाला आवज देण्यासाठी अबरान खान याला 15 लाख रुपयांचं मानधन मिळालं असल्याची माहिती समोर येत आहे. सांगायचं झालं तर, तिन्ही मुलांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःचं नाव कमवावं अशी किंग खानची इच्छा होती. आता शाहरुख खान याची मुलं देखील वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
‘मुफासा द लॉयन किंग’ सिनेमा डिसेंबरमध्ये इंग्रजीसह हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘मुफासा: द लायन किंग’ यामध्ये रफिकीला प्राइड लँड्सच्या राजाची कथा सांगण्यासाठी जोडलं गेलं आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.
शाहरुख खान याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, किंग खान लवकरच ‘किंग’ सिनेमतून चाहत्यांच्या भेटील येणाार आहे. सिनेमात शाहरुख खान पहिल्यांदा लेक सुहाना खान हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. चाहते देखील ‘किंग’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.