शाहरुख खानच्या मुलाचा मिस्ट्री गर्लसोबतचा खास व्हिडीओ समोर, कोण आहे ‘ती’ मुलगी?

| Updated on: Jul 09, 2024 | 11:31 AM

Shah Rukh Khan son Aryan khan : मिस्ट्री गर्लला मिठी मारताना आर्यन खान, शाहरुख खानच्या मुलाचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, व्हिडीओ पाहून म्हणाल..., सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल..., आर्यन खान कायम खासगी आयुष्यामुळे असतो चर्चे

शाहरुख खानच्या मुलाचा मिस्ट्री गर्लसोबतचा खास व्हिडीओ समोर, कोण आहे ती मुलगी?
Follow us on

बॉलिवूड किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता शाहरुख खान नाही तर, अभिनेत्याचा मुलगा आर्यन खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर सध्या आर्यन खान याचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आर्यन खान याच्यासोबत एक मिस्ट्री गर्ल दिसत आहे. आर्यन एका पार्टीमध्ये मिस्ट्री गर्लसोबत दिसत आहे. व्हिडीओमध्ये दोघे धम्माल करताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये आर्यन खानसोबत मिस्ट्री गर्ल असल्यामुळे सर्वत्र दोघांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. व्हिडीओमध्ये किंग खानचा मुलगा मिस्ट्री गर्लसोबत डान्स करताना आणि तिला मिठीत घेताना दिसत आहे. व्हिडीओ समोर आल्यामुळे मिस्ट्री गर्ल कोण आहे? नेटकरी मिस्ट्री गर्लबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. पण त्या मिस्ट्री गर्लबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

 

 

सांगायचं झालं तर, मुंबईत एका ग्रँड पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. मिस्ट्री गर्ल आणि आर्यन खान सोबत पार्टीमध्ये लक्ष्य लालवानी, राघव जुयाल आणि सोहेल खानचा मुलगा निर्वान खान देखील उपस्थित होता. पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सांगायचं झालं तर, आर्यन खान कायम लाईमलाईटपासून दूर राहाण्याचा प्रयत्न करत असतो. पण सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

आर्यन खान याच्या आयुष्यात एका परदेशी मॉडेलची एन्ट्री झाल्याची चर्चा रंगली आहे. आर्यन एका ब्राझिलियन मॉडेलला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. लारिसा बोन्सी असं त्या ब्राझिलियन मॉडेलचं नाव आहे. दोघांचे अनेक फोटो आण व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

लारिसा बोन्सी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिने बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. शिवाय काही तेलुगू सिनेमात देखील लारिसा बोन्सी हिने काम केलं आहे. सध्या सर्वत्र लारिसा बोन्सीआर्यन खान याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. पण दोघे खरंच एकमेकांना डेट करत आहेत की नाहीत.. यावर अधिकृत माहिती समोर आलेली नाही.