Dunki Collection : ‘डंकी’ सिनेमाचा डंका जगभरात, ‘पठाण’, ‘जवान’ ठरणार फेल?

| Updated on: Dec 22, 2023 | 9:14 AM

Dunki Collection : अभिनेता शाहरुख खान स्टारर 'डंकी' सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला आहे... सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत... पहिल्याच दिवशी सिनेमाने मोठी कमाई केली आहे...

Dunki Collection : डंकी सिनेमाचा डंका जगभरात, पठाण, जवान ठरणार फेल?
Follow us on

मुंबई | 22 डिसेंबर 2023 : अभिनेता शाहरुख खान याचा ‘डंकी’ सिनेमाचा डंका जगभरात गाजत आहे. यंदाच्या वर्षी किंग खान याने ‘पठाण’ आणि ‘जवान’ यांसारखे हीट सिनेमे चाहत्यांना दिले. म्हणून अभिनेत्याचा डंकी सिनेमा कसा असेल? याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात मोठी गर्दी केली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘डंकी’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाने तगडी कमाई केली आहे. अशात ‘डंकी’ सिनेमा ‘पठाण’ आणि ‘जवान’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडेल का? अशी देखील चर्चा रंगली आहे.

‘डंकी’ सिनेमाची पहिल्या दिवशीची कमाई

रिपोर्टनुसार, डंकी सिनेमाने पहिल्याच दिवशी भारतात 30 कोटींहून अधिक कमाई केली आहे. सांगायचं झालं तर ‘पठाण’ आणि ‘जवान’ सिनेमाच्या पहिल्या दिवसाची कमाई ‘डंकी’ सिनेमापेक्षा अधिक होती. रिलीजच्या पहिल्या दिवशी ‘जवान’ सिनेमाने भारतात 89 कोटींची कमाई केली होती. पठाण सिनेमाने 57 कोटींचा आकडा गाठला होता. पण ‘डंकी’ सिनेमाने पहिल्या दिवशी 30 कोटी रुपयांचा कमाई केली आहे. त्यामुळे येत्या दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांचा आकडा पार करते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

पहिल्या दिवाशी सिनेमाची कमाई 30 कोटी रुपये झाली असली तरी, सिनेमाची कथा लोकांना खूप आवडली आहे. सिनेमा जगभरात धुमाकूळ घालत आहे. रिपोर्ट्सनुसार, डंकी सिनेमाने जगभरात 55 कोटींची कमाई केली. जवाना सिनेमाने पहिल्या दिवशी एकूण 129 कोटींची कमाई केली होती. सध्या सर्वत्र ‘डंकी’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, शाहरुख खान याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी चार वर्ष किंग खान अभिनयापासून दूर होता. पण ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र शाहरुख खान याची क्रेझ चाहत्यांमध्ये पुन्हा वाढली. आता ‘डंकी’ सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.