Jawan | दुसऱ्या दिवशी ‘पठाण’चा रेकॉर्ड ब्रेक करण्यास ‘जवान’ फेल, कामावले इतके कोटी

| Updated on: Sep 09, 2023 | 8:13 AM

Jawan | पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी 'जवान' सिनेमाचा वेग मंदावला; 'पठाण' सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक करण्यास 'जवान' फेल, दुसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी...

Jawan | दुसऱ्या दिवशी पठाणचा रेकॉर्ड ब्रेक करण्यास जवान फेल, कामावले इतके कोटी
Follow us on

मुंबई : 9 सप्टेंबर 2023 | अभिनेता शाहरुख खान याने यंदाच्या वर्षा बॅक टू बॅक दोन हीट सिनेमे दिले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, किंग खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते सिनेमागृहात गर्दी करत आहेत. ‘पठाण’ नंतर ‘जवान’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी ‘जवान’ सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडत तब्बल ७५ कोटी रुपयांची कमाई केली. ‘जवान’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर आता प्रवास सुरु झाला आहे. आता दुसऱ्या दिवशी सिनेमाने तुफान कमाई केली. पण ‘जवान’ दुसऱ्या दिवशी ‘पठाण’ सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक करू शकलेला नाही. तर शनिवार – रविवार असल्यामुळे सिनेमा किती कोटी रुपयांचा गल्ला जमा करेल… हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमाने प्रदर्शनानंतर पहिल्या दिवशी देशात ७५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. तर जगभरात सिनेमाने १०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. किंग खानच्या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ दिसून येत आहे. अभिनेत्याला पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यासोबतच ‘जवान’च्या रिलीजच्या दुसऱ्या दिवसाची अंदाजे कमाईही समोर आली आहे.

रिपोर्टनुसार, ‘जवान’ सिनेमाने दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ५० कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती मिळत आहे. ज्यामध्ये हिंदी आणि तमिळ आघाडीवर आहेत. सिनेमाच्या दोन दिवसांच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, ‘जवान’ सिनेमाने दोन दिवसांत १२५ कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती मिळत आहे. ‘जवान’ सिनेमाच्या तिकिटाची किंमत २ हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या ९ हजारहून अधिक तिकिटांची कमाई झाली आहे.

हे सुद्धा वाचा

दुसऱ्या दिवशी ‘जवान’ नाही मोडू शकला ‘पठाण’चा रेकॉर्ड

‘जवान’ सिनेमाने दोन दिवसांत १०० कोटी रुपयांचा गल्ला पार करत इतिहास रचला आहे. पण दुसऱ्या दिवशी ‘जवान’ सिनेमा ‘पठाण’चा रेकॉर्ड मोडू शकला नाही. ‘पठाण’ सिनेमा २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता. ‘पठाण’ने दुसऱ्या दिवशी ७०.५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. कारण २६ जानेवारी निमित्त सुट्टी होती. आता तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे ‘जवान’ सिनेमा किती कोटी रुपयांची करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.