मुंबई : 16 सप्टेंबर 2023 | दाक्षिणात्य सिनेविश्वातील दिग्दर्शक अॅटली याच्या दिग्दर्शना खाली साकारण्यात आलेला ‘जवान’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमात अभिनेता शाहरुख खान आहे. म्हणून सिनेमा हीट होणारच अशी चर्चा सिनेमा प्रदर्शित होण्यापू्र्वी रंगली होती. सिनेमात शाहरुख खान याची मुख्य भूमिका आहे, म्हणून सिनेमा प्रदर्शित झाला हे तर सत्य आहेच, पण दिग्दर्शक अॅटली याच्या दिग्दर्शनामुळे सिनेमा एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. अशात शनिवार आणि रविवार असल्यामुळे सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल याकडे देखील अनेकांचं लक्ष लागलं आहे.
‘जवान’ सिनेमा ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर अॅटली आणि शाहरुख खान यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत अॅटली याने स्वतःच्या यशाबद्दल मोठं सत्य सर्वांना सांगितलं आहे. अॅटली याचा प्रत्येक सिनेमा का हीट होतो…. याबद्दल अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र अॅटली त्याच्या यशाच्या फॉर्म्युल्याची चर्चा रंगली आहे.
सिनेमाला मिळालेल्या यशाबद्दल अॅटली म्हणाला, ‘जवान माझ्यासाठी काय आहे, हे सांगण्यासाठी मला त्या दिवसाचा उल्लेख करावा लागेल, जेव्हा मी शाहरुख खान याला भेटलो आणि आम्ही एकत्र सिनेमा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मी एक कोरा कागद घेतला आणि एखाद्या ‘लव्हलेटर’प्रमाणे ‘जवान’ची सुरुवात केली…’जवान’ माझ्यासाठी एक प्रेम पत्र आहे…’
जेव्हा अॅटली याला त्याच्या यशाबद्दल विचारलं, तेव्हा दिग्दर्शक म्हणाला, ‘मी लेखक, दिग्दर्शक नाही तर एक चाहता आहे. मी सिनेमांचा चाहता आहे. माझा यश मिळवण्यासाठी कोणता फॉर्म्युला नाही. मला वाटलं तेच मी सिनेमात केलं आणि सिनेमा हिट झाला. अशात मी तुम्हाला नाही सांगू शकत की, मला माझ्या यशाचा फॉर्म्युला कसा मिळाला.’ सध्या सर्वत्र अॅटली यांच्या ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.
शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमाने ७०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. आता येत्या दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिनेमात शाहरुख खान याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेत्री नयनतारा यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.