Pathan Box Office Collection day 10 : अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टाटर ‘पठाण’ सिनेमा फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील विक्रम रचत आहे. गेल्या १० दिवसांपासून सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर असलेला बोलबाला निर्मात्यांसह चाहत्यांना थक्क करत आहे. निर्मात्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार सिनेमाने आतापर्यंत जगभरात ७२५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. १० दिवसांमध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीमध्ये पठाण सिनेमा आठव्या स्थानी आहे. सध्या सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावला असला तरी जगभरात सिनेमा नवे विक्रम रचताना दिसत आहे.
पठाण सिनेमाने प्रदर्शनानंतर ९ दिवसांत ७०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. तर विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार दहाव्या दिवशी सिनेमाने भारतात जवळपास १५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. नव्या दिवशी सिनेमाने १५ ते १६ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. पहिल्या पाच दिवसांत सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले. सध्या सर्वत्र पठाण सिनेमाची चर्चा आहे.
पठाण सिनेमाने जगभरात अनेक भारतीय सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत, पण आतापर्यंत ‘केजीएफ चॅप्टर २’ आणि ‘बाहुबली २’ सिनेमाच्या डोमेस्टिक कलेक्शनला पठाण हारवू शकला नाही. यंदाच्या शनिवार – रविवारी पठाण सिनेमा ‘दंगल’ सिनेमाला मागे टाकत नवा रेकॉर्ड करु शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनी साकारलेल्या भूमिकांची देखील चर्चा रंगत आहे. पठाण सिनेमात दीपिका जबरदस्त अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे. शिवाय सलमान खानची एक अप्रतिम कॅमिओ भूमिका चाहत्यांच्या मनात घर करत आहे. म्हणून पुन्हा मोठ्या पडद्यावर शाहरुख आणि सलमान खान यांना पाहणं चाहत्यांसाठी खास आहे.
महत्त्वाचं शाहरुख खान याने मोठ्या पडद्यावर चार वर्षांनंतर पुन्हा पदार्पण केल्यामुळे अभिनेत्याला पाहण्यासाठी अनेक चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने ‘बेशर्म रंग’ गाण्यामध्ये घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण कोणत्याही वादाचा बॉक्स ऑफिसवर कोणताही परिणाम झाला नाही.
चार वर्षांपूर्वी शाहरुख २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. चार वर्षांनंतर अभिनेत्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्याने ‘पठाण’ सिनेमाचं प्रमोशन देखील केलेलं नाही. पण ट्विटरवर #askSRK सेशनच्या माध्यमातून अभिनेता थेट चाहत्यांच्या संपर्कात होता.