‘पठाण’ चा तिसऱ्या दिवशी वेग मंदावला; शनिवारी मात्र सिनेमाने केली इतक्या कोटींची कमाई

| Updated on: Jan 29, 2023 | 8:36 AM

शनिवारी सुट्टी असल्याचा शाहरुख खान स्टारर पठाण सिनेमाला झाला फायदा ? तिसऱ्या दिवशी सिनेमाने फक्त ३९ कोटी रुपयांची कमाई केली. किंग खानच्या सिनेमाची क्रेझ वाढतेय की कमी होतेय?

पठाण चा तिसऱ्या दिवशी वेग मंदावला; शनिवारी मात्र सिनेमाने केली इतक्या कोटींची कमाई
Follow us on

Pathaan BO Collection Day 4: सध्या सर्वत्र पठाण सिनेमाची चर्चा आहे. अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांनी चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. तिसऱ्या दिवशी पठाणच्या कमाईला ब्रेक लागला, पण चौथ्या दिवशी मात्र सिनेमाने पुन्हा आपली जादू बॉक्स ऑफिसवर दाखवली. चार वर्षांनंतर किंग खान याने पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यामुळे अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शुक्रवारी सुट्टी नसल्यामुळे सिनेमाला त्याचा फटका बसला. पण शनिवारी मात्र सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली. चौथ्या दिवशी पुन्हा शाहरुख खान स्टारर पठाण सिनेमाने नवा विक्रम रचला आहे.

पहिल्या दिवशी पठाण सिनेमाने ५७ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिनेमाने तब्बल ७० कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. पण तिसऱ्या दिवशी मात्र पठाण सिनेमाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तिसऱ्या दिवशी सिनेमाने ३९ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला. चौथा दिवस शनिवार असल्यामुळे सिनेमाने पुन्हा बॉक्स ऑफिसचवर उंच उडी मारली.

 

पठाण सिनेमाच्या चौथ्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत. शनिवार असल्यामुळे सिनेमाने ५५ कोटी रुपयांचा कमाई केली आहे. म्हणजे पठाण सिनेमाच्या चार दिवसांच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने २२१.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत आहे. सध्या सर्वत्र पठाण सिनेमाची चर्चा आहे.

फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील पठाण सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. सिनेमाने तीन दिवसांत परदेशात ३०० कोटी रुयांचा गल्ला जमा केला आहे. आता सिनेमाकडून चाहते आणि निर्मात्यांच्या आपेक्षा वाढताना दिसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करतो. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनी साकारलेल्या भूमिकांची देखील चर्चा रंगत आहे. पठाण सिनेमात दीपिका जबरदस्त अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे. शिवाय सलमान खानची एक अप्रतिम कॅमिओ भूमिका चाहत्यांच्या मनात घर करत आहे. म्हणून पुन्हा मोठ्या पडद्यावर शाहरुख आणि सलमान खान यांना पाहणं चाहत्यांसाठी खास आहे.