मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : अभिनेता शहरुख खान याच्यासोबत आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी स्क्रिन शेअर केली आहे. किंग खान याच्यासोबत काम केल्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ देखील झाली. शाहरुख याच्यामुळे प्रसिद्धी झोतात आलेल्या अभिनेत्रींच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टी चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री माहिरा खान आहे. माहिरा खान हिने रविवारी बॉयफ्रेंड सलीम करीम याच्यासोबत लग्न केलं आहे. माहिराने लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी उद्योजकाला पाच वर्षे डेट केलं. पाकिस्तानी अभिनेत्रीच्या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
माहिरा खान आणि सलीम करीम यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पाडला. लग्नाचा पहिला व्हिडिओ माहिरा हिचा मॅनेजर अनुशय तलहा खान याने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, माहिरा नवरीच्या रुपात प्रचंड सुंदर दिसत आहे. लग्नाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहते देखील व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ आणि फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. वयाच्या ३८ व्या वर्षी अभिनेत्रीने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला.
My heart 🤍
May this be the beginning of a beautiful life ahead for you! You deserve every ounce of happiness #MahiraKhan pic.twitter.com/7DHBIjHTGf
— ~ɐuıH~ (@DarGaeKya) October 1, 2023
माहिरा हिच्या पहिल्या लग्नाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अभिनेत्रीचं पहिलं लग्न अली अस्करी याच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं लग्न अधिक काळ टिकलं नाही. २०१५ मध्ये माहिरा आणि अली यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अली आणि माहिरा यांना एक मुलगा देखील आहे. पण २०१७ मध्ये माहिरा तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली होती.
सध्या अभिनेत्री तिच्या दुसऱ्या लग्नामुळे व्यस्त आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री तिच्या रिलेशनशिपमुळे तुफान चर्चेत होते. २०१७ मध्ये माहिरा आणि रणबीर कपूर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता. दोघांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. परदेशात दोघे सिगारेट पिताना दिसत होते.
माहिरा हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. माहिराने २०१७ मध्ये शाहरुख खानसोबत रईसमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र त्यानंतरच पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. बंदीनंतर माहिरा इतर कोणत्याही भारतीय प्रोजेक्टमध्ये दिसलेली नाही. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सध्या अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.