मुंबई : अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता कायम सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचा प्रयत्न करत असतो. एवढंच नाही तर, अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते देखील कायम उत्सुक असतात. पण आता अभिनेता एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगत आहे. नुकताच अभिनेत्याने आक्स एसआरके सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला. या सेशनमध्ये अभिनेत्याने चाहत्यांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या, एवढंच नाही तर, अभिनेत्याने त्याच्या वाईट सवयींबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
आक्स एसआरके सेशन दरम्यान एका ट्विटर युजरने शाहरुख खान याला विचारलं की, ‘सोबत सिगारेट प्यायला जायचं का सर?’ यावर अभिनेता म्हणाला, ‘मी माझ्या वाईट सवयी एकांतात करतो…’ सध्या किंग खान याने चाहत्याच्या प्रश्नाला दिलेलं उत्तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र शाहरुख आणि त्याच्या वाईट सवयींची चर्चा सुरु आहे.
शाहरुख खान याने चार वर्षांनंतर ‘पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पुन्हा दमदार पदार्पण केलं. अभिनेत्याच्या ‘पठाण’ सिनेमाने जगभरात नवे विक्रम रचले. ‘पठाण’ सिनेमात ‘बेशर्म रंग’ गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे तुफान वाद रंगला होता. एवढंच नाही तर, सिनेमला अनेक ठिकाणी बॅन देखील करण्यात आलं होतं. पण कोणत्याही वादाचा परिणाम सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर झाला नाही.
सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कामगिरी केली. महत्त्वाचं म्हणजे शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमा यंदाच्या वर्षातील सर्वांत जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. सिनेमाने फक्त भारतातच नाही जगभरात कोट्यवधी रुपयांची कमाई केली. आता शाहरुख खान ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
फक्त ‘जवान’ सिनेमाच नाही तर, अभिनेता ‘डंकी’ सिनेमाच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘पठाण’ सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सध्या सर्वत्र शाहरुख खान याच्या सिनेमांची चर्चा सुरु आहे. किंग खान अभिनेता सलमान खान यांच्या ‘टायगर ३’ सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे.
सोशल मीडियावर देखील किंग खान कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर देखील शाहरुख खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता सतत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो.