Shahrukh Khan ने आलियासह लेक सुहानालाही 6 तास दिले ‘हे’ ट्रेनिंग… करण जोहरने केला मोठा खुलासा

| Updated on: Aug 10, 2023 | 11:24 AM

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटात शाहरुख दिसला नाही, पण तरीही तो चित्रपटाचा एका भाग होता, असे करण जोहरने नमूद केले.

Shahrukh Khan ने आलियासह लेक सुहानालाही 6 तास दिले हे ट्रेनिंग... करण जोहरने केला मोठा खुलासा
Follow us on

Shahrukh Khan Trained Alia Bhatt : ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani ki Prem Kahani) चित्रपट सध्या बॉक्स ऑफीसवर धमाल करत आहे. करण जोहरचा (Karan Johar) चित्रपट आणि त्यात त्याचा जिगरी दोस्त शाहरुख खान (Shah Rukh Khan) दिसला नाही ? थोडं विचित्र वाटतं ना, कारण करणच्या प्रत्येक चित्रपटात शाहरूख असतोच. पण ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्येही शाहरूख होता, असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर ? खरं वाटत नाही ना, पण हेच खरं आहे. खुद्द करण जोहरनेच याची कबुली दिली.

या चित्रपटात शाहरूख दिसला नसला तरी तो त्याचा हिस्सा होता. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये शाहरूखचा कॅमिओ तरी असेल अशी प्रेक्षकांना आशा होती, पण तसं झालं नाही. मात्र तो या चित्रपटाचा एक भाग होता. नुकत्याच एका मुलाखतीत करण जोहरनेच हा खुलासा केला. या चित्रपटातील ‘तुम क्या मिले’ या गाण्यासाठी त्याने अभिनेत्री आलिया भट्टला लिप सिंक करण्यास शिकवले होते. चित्रपटात किंग खान कॅमिओ करण्याची ऑफर का दिली नाही, असे विचारण्यात आले असता करण म्हणाला की, शाहरूख मला कधीच नकार देणार नाही पण कारण नसताना त्याचा कॅमिओ दाखवणं मला पटलं नाही.

शाहरूख मला कधीच नकार देणार नाही

करण म्हणाला, शाहरुख मला कधीच नाही म्हणणार नाही. पण मला अस वाटतं की हे कार्ड आपण जपून ठेवलं पाहिजे. दरम्यान या पूर्वी आलियानेही हे कबूल केलं होतं की शाहरुखने तिला आणि त्याची लेक सुहाना खान हिलाही गाण्यांसाठी लिप सिंक कसं करायचं ते शिकवलं होतं.

आलियाने केली 6 तास प्रॅक्टिस

‘ तुम क्या मिले ‘ गाण्यासाठी शाहरूखने आलियाला 6 तास प्रॅक्टिस करायला लावली होती, असे करणने सांगितले. जेव्हा तुम्ही म्युझिकवर स्लो मोशन साँग किंवा हाय-स्पीड साँग करता, तेव्हा ते डबल होतं, लिप सिंक कॅच करण्यासाठी, तुम्हालाही तसंच करावं लागतं, ते एक टेक्निक आहे. शाहरुख अतिशय बुद्धिमान आहे, त्याने काही दिवसांतच या टेक्निकवर प्रभुत्व मिळवले होते, असेही करण म्हणाला.