मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : अभिनेता शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. किंग खान याने तब्बल चार वर्षांनंतर ‘पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यामुळे चाहत्यांनी देखील रुपेरी पडद्यावर अभिनेत्याला पाहण्यासाठी गर्दी केली. ‘पठाण’ सिनेमाने फक्त भारतात नाही तर, जगभरात तगडी कमाई केली. सिनेमा प्रगर्शित होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण सिनेमाला होणाऱ्या विरोधाचा आणि वादाचा कोणताही परिणाम बॉक्स ऑफिसवर झाला नाही. आता शाहरुख खान लवकरच ‘जवान’ सिनेमााच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अभिनेता व्यस्त आहे. पण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून किंग खान याने वैष्णोदेवीच्या दरबारात हजेरी लावली आहे.
अभिनेत्याचा वैष्णोदेवीच्या दरबारात जाताना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘जवान’ सिनेमा ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चेन्नई येठिकाणी ‘जवान’ सिनेमाता म्यझिक लॉन्स सोहळा पार पडणार आहे. पण त्याआधी किंग खान जम्मू याठिकाणी पोहचला आहे. वैष्णोदेवीच्या दरबारात जाताना अभिनेत्याने निळ्या रंगाचा जॅकेट आणि मास्क लावला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान याच्यासोबत बॉडीगार्ड्स देखील दिसत आहेत. सांगायचं झालं तर, ‘पठाण’ सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी शाहरुख खानने कटरा येथील वैष्णोदेवी मंदिरालाही भेट दिली होती. आता अभिनेता वैष्णोदेवीच्या दरबारात पोहोचला आहे. सध्या सर्वत्र किंग खान याच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.
शाहरुख खान याचा आगामी ‘जवान’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर उद्या ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहते ट्रेलरच्या प्रतीक्षेत आहेत. गुरुवारी रात्री बुर्ज खलीफावर देखील ‘जवान’ सिनेमाचा ट्रेलर दाखवण्यात येणार असल्याची चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर, शुक्रवारी दुबईत ‘जवान’ सिनेमासाठी स्पेशल इव्हेंटचं देखील आयोजन करण्यात आलं आहे.
जवान सिनेमाचं दिग्दर्शन टॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली यांनी केलं आहे. शाहरुख स्टारर ‘जवान’ सिनेमा ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमात शाहरुख याच्यासोबत विजय सेतुपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा आणि प्रियामणी यांच्या भूमिका आहेत. सिनेमात दीपिका पदुकोणचाही एक कॅमिओ आहे.