Video : दुबईमध्ये शाहरुख खान याची फुल्ल धमाल, व्हिडीओ तूफान व्हायरल, क्लबमध्ये अभिनेत्याने चक्क

| Updated on: Sep 02, 2023 | 3:21 PM

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आहे. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह हा बघायला मिळत आहे. जवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Video : दुबईमध्ये शाहरुख खान याची फुल्ल धमाल, व्हिडीओ तूफान व्हायरल, क्लबमध्ये अभिनेत्याने चक्क
Follow us on

मुंबई : बाॅलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह हा बघायला मिळत आहे. शाहरुख खान याचे एका मागून एक असे चित्रपट (Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे पठाण चित्रपटाने मोठा धमाका करत अनेक रेकाॅर्ड तोडले. पठाण चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील शाहरुख खान हा दिसला.

शाहरुख खान याचा आता जवान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. शाहरुख खान याचा जवाननंतर लगेचच डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर बाॅलिवूडमध्ये पुनरागमन केले. विशेष म्हणजे पठाण हा चित्रपट सुपरहिट ठरला.

शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाचे नुकताच ट्रेलर रिलीज करण्यात आले. विशेष म्हणजे दुबईच्या बुर्ज खलीफा बिल्डींगवर हे ट्रेलर दाखवण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान हा त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन भारतामध्ये फार काही करताना दिसत नाहीये. विशेष म्हणजे चाहत्यांना शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाचा ट्रेलर आवडलाय.

सध्या सोशल मीडियावर शाहरुख खान याचा दुबईच्या क्लबमधील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान हा फुल धमाल करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान हा त्याच्या पठाण चित्रपटाच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. इतकेच नाही तर जवान चित्रपटाच्या गाण्यावरही तो डान्स करतोय.

जिंदा बंदा या गाण्यावर देखील शाहरुख खान याने जबरदस्त असा डान्स केलाय. छैया छैया गाण्याचे स्टेप्स करताना देखील यावेळी शाहरुख खान हा दिसला. इतकेच नाही तर आपल्या चाहत्यांना हात मिळवताना या व्हिडीओमध्ये शाहरुख खान हा दिसत आहे. आता शाहरुख खान याचा हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

शाहरुख खान याने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन हे केले. या सेशनमध्ये शाहरुख खान आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिसला. शाहरुख खान याला जवान या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आता जवान चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.